सोशल मीडियावरील केदारनाथचा Viral Video पाहिलात का, पाहून म्हणाल येथे तर...

| Published : May 26 2024, 09:43 AM IST / Updated: May 26 2024, 09:44 AM IST

केदारनाथ मंदिराकडे जातानाची गर्दी

सार

सध्याच्या घडीला केदारनाथ येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असून भाविकांचा येथे महापूर लोटल्याचे दिसून येत आहे. राजेश साहू या एक्स अकाऊंटवरून टाकलेल्या व्हिडिओमध्ये लांबच लांब रांगा असून त्यामध्ये भाविक दर्शनासाठी उभे असल्याचे दिसून आले आहे. 

चारधाम यात्रा करत असताना केदारनाथ या देवस्थानाला मोठं महत्व आहे. याठिकाणी जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये कायमच भर पडताना दिसून येत आहे. येथे जाणारे देशातून अनेक भाविक असून त्यांची केदारनाथवर भक्ती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. 

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ - 
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये भाविकांची लांबच लांब रांग लागलेली दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये मंदिराकडे जाणारे आणि येणारे भाविक दिसून येत आहेत. व्हिडिओतील भाविकांमध्ये चार चाकी, दोन चाकी आणि भाविक सर्वच जण एकत्र आल्यामुळे गर्दीला संभाळता येत नसून नजर जाईल तिथपर्यंत भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. 

व्हिडिओवर काय आल्या कमेंट - 
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर अनेक लोकांच्या कमेंट आल्या आहेत. त्या कमेंटमध्ये खासकरून भाविकांची संख्या हजारामध्ये असल्याचे लक्षात येत आहे. काही लोकांनी येथे पोहचलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शन मिळायला हवे असे म्हटले आहे तर काही लोकांनी यामध्ये जास्तीत जास्त रील काढणाऱ्या भाविकांचा समावेश असल्याची भावना व्यक्त केली आहे. एका भक्ताने येथे लोकांना जाण्यापासून रोखायला हवे असे म्हटले आहे, येथे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचे त्याने म्हटले आहे. 
आणखी वाचा -
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये रस्ते अपघात 11 जणांचा मृत्यू, बसवर डंपर पडल्यामुळे घडली घटना
Gujrat, Rajkot Fire : राजकोटमध्ये गेम झोन जळून खाक, 20 जणांचा मृत्यू