सार
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जगन्नाथ पुरी मंदिराच्या गजपति दिव्यसिंह देव यांच्यासह जन्ननाथ पुरी हेरिटेज कॉरिडोरचे उद्घाटन केले आहे. या प्रोजेक्टला तयार करण्यासाठी 800 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
Jagannath Puri Heritage Corridor : ओडिशातील जगन्नाथ पुरी हेरिटेज कॉरिडोरचे काम पूर्ण झाले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी जगन्नाथ पुरी हेरिटेज कॉरिडोरचे आज (17 जानेवारी) उद्घाटन केले आहे. या कार्यक्रमासाठी भारत आणि नेपाळमधील (Nepal) एक हजार मंदिरांना आमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. याशिवाय चारही शंकराचार्य, चार धाम आणि चार अन्य लहान धामांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मंदिर प्रशासनाकडून नेपाळच्या राजघराण्यालाही आमंत्रित करण्यात आले होते. मंदिराचा हा प्रोजेक्ट आता सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आले आहे.
डिसेंबर 2019 मध्ये सुरू झाले होते काम
डिसेंबर, 2019 मध्ये जगन्नाथ पुरी मंदिर हेरिटेज कॉरिडॉरचे काम सुरू करण्यात आले होते, जे आता पूर्ण झाले आहे. प्रकल्पानुसार, मंदिराच्या बाहेरच्या भितीला चहूबाजूंनी 75 मीटर रूंद कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. याशिवाय मंदिराच्या चारही बाजूंना दोन किलोमीटरमध्ये श्री मंदिर परिक्रमा मार्ग बांधण्यात आला आहे. येथून भाविकांना थेट मंदिरात दर्शन घेता येणार आहे.
हेरिटेज प्रकल्पाअंतर्गत जे रिसेप्शन तयार करण्यात आले आहे त्यामध्ये सहा हजार भाविकांना एकत्रित उभ राहाता येणार आहे. याशिवाय चार हजार परिवारांना सामान ठेवण्यासाठी लॉकर रूम बनवण्यात आले आहेत. शेल्टर पव्हेलियन व्यतिरिक्त मल्टीलेव्हल कार पार्किंग, पोलीस, अग्नीशमन दल आणि आपत्कालीन सुविधेसाठी शटल बसची सुविधाही पुरवली जाणार आहे.
12व्या शतकात उभारण्यात आले होते जगन्नाथ पुरी मंदिर
ओडिशामधील जगन्नाथ पुरी मंदिराचे बांधकाम 12व्या शतकात करण्यात आले होते. आता 21व्या शतकात 800 कोटी रूपये जगन्नाथ पुरी मंदिर हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पासाठी खर्च करण्यात आला आहे. उद्घाटनाच्या दोन दिवस आधी महायज्ञाचा प्रारंभ करण्यात आला होता. आज कॉरिडोरचे उद्घाटन केल्यानंतर सर्व भाविकांसाठी सुरू करण्यात आला आहे.
आणखी वाचा :
57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दल करण्यात आली होती भविष्यवाणी, सोशल मीडियावर पोस्टाचे तिकीट व्हायरल
Ram Mandir Pran Pratishtha : मंदिरात आज होणार रामललांचा प्रवेश, जाणून पुढील सोहळ्याचे वेळापत्रक