सार

अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज रामलला मंदिरात प्रवेश करणार आहेत. जाणून घेऊयात सोहळ्याचे वेळापत्रक सविस्तर…

Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. राम मंदिराच्या धार्मिक विधींना 16 जानेवारीपासूनच सुरुवात झाली आहे. आज (17 जानेवारी) रामललांची मूर्ती मंदिरात आणली जाणार आहे.

शरयू नदीच्या मंगल कलशातून आणले जाणार पवित्र जल
आज असणाऱ्या कार्यक्रमानुसार, प्रभू श्रीरामांचे भक्त मंगल कलशातून शरयू नदीतून पवित्र जल घेऊन मंदिरात येणार आहेत. याआधी शरयू नदीच्या तटावर आरती केली जाणार आहे. या कार्यक्रमानतंर अन्य अनुष्ठान पार पडणार आहे. खरंतर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधींचे वेळापत्रक

  • 17 जानेवारीला रामललांची मूर्ती अयोध्येत आणण्यात येणार आहे. यावेळी भाविक शरयू नदीचे पाणी मंगल कलशात घेऊन राम मंदिरात पोहोचणार आहेत.
  • 18 जानेवारीला गणेश अंबिका पूजनापासून कार्यक्रमाची औपचारिक पद्धतीने सुरुवात होणार आहे. यानंतर वरुण पूजा, मातृता पूजा, ब्राम्हण वरण आणि वास्तु पूजा केली जाणार आहे.
  • 19 जानेवारीला नवग्रह आणि हवनसाठी पवित्र अग्नी प्रज्वलित केला जाणार आहे.
  • 20 जानेवारीला राम मंदिराची स्वच्छता शरयू नदीच्या पाण्याने केली जाणार आहे. याशिवाय वास्तु शांति आणि अन्नदिवस पूजा केली जाणार आहे.
  • 21 जानेवारीला रामललांना स्नान घातले जाणार असून मूर्तीची वैदिक पद्धतीने स्थापना केली जाणार आहे.
  • 2 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरु होणार आहे. या सोहळ्यासाठी 150 देशांतील नागरिक उपस्थितीती लावणार आहेत.

प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत- मीनाक्षी लेखी
केंद्रीय कॅबिनेट मंत्री मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) यांनी म्हटले की, प्रभू श्रीराम आपल्या सर्वांचे आहेत. सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या हृदयात भगवान राम यांचा निवास आहे. सर्वजण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत.

याशिवाय टेलिव्हिजनवरील मालिका ‘रामायणा’चे निर्माता रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांना देखील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे मोती सागर यांनी आम्हाला सोहळ्यासाठी उपस्थिती लावण्याचे भाग्य लाभल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : 

अयोध्या नगरीत Light and Sound Show पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह, पाहा व्हिडीओ

विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी अमेरिकेत खास कार्यक्रमाचे आयोजन, भारतीयांनी दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा (Watch Video)

गीता प्रेसकडून रामचरितमानस 10 भाषांमध्ये मोफत डाउनलोडची सुविधा, अशी मिळवा पुस्तकाची प्रत