सार

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे.

Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (22 जानेवारी) अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील सुंदर क्षणांचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासंदर्भातील शेअर केलेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “'काल आम्ही अयोध्येमध्ये जे पाहिले, ते क्षण पुढील अनेक वर्षे आमच्या आठवणींमध्ये कायम राहतील.”

पंतप्रधानांनी 3 मिनिट 5 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे खास क्षण टिपल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये पंतप्रधान रामललांची पूजा करताना दिसून येत आहेत. याशिवाय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसतेय.

अयोध्येत पार पडला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य दिव्य सोहळा
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच अयोध्येत पार पडला. यावेळी रामललांची गर्भगृहात विधिवत पूजा करत स्थापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी जवळजवळ आठ हजार जणांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठेवेळी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), राज्यपाल आनंदीबेन पटेल (Governor Anandiben Patel) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुखे मोहन भागवत (Mohan Bhagwat) उपस्थितीत होते.

रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोहळ्यासाठी आमंत्रितांनाच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता आले. आजपासून (23 जानेवारी) सर्वसामान्य भाविकांसाठी रामललांच्या दर्शनासाठी सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा : 

YouTube वर सर्वाधिक पाहिले गेले राम मंदिराचे लाइव्ह प्रक्षेपण, मिळाले ऐवढे व्हूज

Ram Mandir Pran Pratishtha : 'देव ते देश आणि राम ते राष्ट्रापर्यंत भक्ती असावी', पाहा नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

रामललांचे या वेळात भाविकांना घेता येणार दर्शन, जाणून घ्या अधिक