रामललांचे या वेळात भाविकांना घेता येणार दर्शन, जाणून घ्या अधिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येतील रामललांची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यावेळी मोहन भागवत, आनंदीबेन पटेल आणि योगी आदित्यनाथ गर्भगृहात उपस्थितीत होते.
प्राणप्रतिष्ठेसाठी बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर, आलिया भटसह उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह अन्य व्हीव्हीआयपींनी उपस्थिती लावली होती.
रामललांच्या विश्रामासाठी मंदिर दुपारी दीड तासांची बंद ठेवले जाणार आहे. मंदिर सकाळी 11.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
23 जानेवारीला भाविकांसाठी राम मंदिरात रामललांचे दर्शन घेता येणार आहे. दर्शनाची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 11.30 आणि दुपारी 2.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
राम मंदिरात तीन वेळा आरती होणार आहे. पहिली आरती सकाळी 6.30 वाजता, दुपारची आरती 12.00 वाजता आणि तिसरी आरती संध्याकाळी 7.30 वाजता असणार आहे.
आरतीसाठी सर्व भाविकांना पास घेणे अनिवार्य असणार आहे. यासाठी भाविकांना ओखळपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. एका वेळच्या आरतीसाठी केवळ 30 जणांना उपस्थिती लावता येणार आहे.