PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान मोदींमुळे महिलांची ताईगिरी वाढली का? पंतप्रधान व काशीतील महिलांमधील संवादाचा मजेदार व्हिडीओ पाहा

| Published : Feb 24 2024, 11:10 AM IST / Updated: Feb 24 2024, 02:02 PM IST

Narendra Modi

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यावर असताना येथील महिलांची भेट घेतली. त्या वेळी महिलांनी गीर गाईमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत झालेल्या बदलांची माहिती दिली. 

Prime Minister Modi visit to Varanasi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल म्हणजेच शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर होते. वाराणसीतील अनेक कार्यक्रमात ते सहभागी झाले. काल त्यांनी कारखियांव येथील (UPSIDA) ऍग्रो पार्क येथे बनसकांठा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या दूध प्रक्रिया युनिट बनस काशी संकुलचे उद्घाटन केले, त्याचा उद्देश गायी पाळणाऱ्या शेतकऱ्यांना सक्षम करणे हा आहे. त्यादरम्यान त्यांनी तेथील महिलांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) महिलांची भेट घेतली आणि त्यांची प्रकृती विचारली.  अनेक महिलांनी पंतप्रधान मोदींना गीर गाईमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत झालेल्या बदलांची माहिती दिली.

एका महिलेने सांगितले की, पूर्वी आमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण जेव्हापासून सरकारने आम्हाला गीर गाई दिली, तेव्हापासून दूध विकून चांगले पैसे मिळतात. त्यामुळे आमची परिस्थितीही पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. संभाषणादरम्यान पीएम मोदींनी एका महिलेला गंमतीने सांगितले की, तुम्ही चांगले कमावत आहात, यामुळे तुमची घरातील गुंडगिरी वाढली नाही का? यावर उपस्थित सर्व लोक हसू लागले.

 

 

यासंबंधीचा एक व्हिडिओ त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर शेअर केला आहे. पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, बाबा विश्वनाथ यांच्या शहरातील माता-भगिनींकडून हे जाणून खूप समाधान वाटले की, गीर गाई मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात खूप बदल झाला आहे.

वाराणसीमध्ये महिलांनी सुरु केले स्टार्टअप
पंतप्रधान मोदींनी एका महिलेला गंमतीत सांगितले की, मी नेहमी म्हणतो की दुधाचे पैसे फक्त महिलांच्या बँक खात्यात जावेत. याचा अर्थ मोदी घराघरात भांडण निर्माण करतील असे तुम्ही लोक समजू नये. याशिवाय एका महिलेने सांगितले की, मी दूध विकण्यासोबतच शेणही विकते आणि भरपूर पैसे कमावते. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही स्टार्टअप सुरू केले आहे.

आणखी वाचा : 
Farmer Protest : 29 फेब्रुवारीपर्यंत 'दिल्ली चलो' आंदोलन स्थगित, आंदोलक तरुणाच्या मृत्यूवर कार्यवाही करण्याची मागणी
PM Modi Visit UP : '10 वर्षांत बनारसने मला बनारसी बनवले', अमूल बनास डेअरी प्लांटच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केल्या अशा भावना
PM Modi Visit Gujarat : डबल इंजिन सरकारचा फायदा घेत गुजरात दुग्ध व्यवसायात पुढे, पंतप्रधानांनी अहमदाबादमधील सोहळ्यात मांडले हे मुद्दे