सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये कोट्यावधी रुपयांच्या नव्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.
PM Modi Visit Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांनी सहकार संम्मेलनात 1200 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाच नव्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. याशिवाय सहकार संम्मेलनात पनीर, आइस्क्रिम आणि चॉकलेट प्लांटचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
आज (22 फेब्रुवारी) गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा सुवर्णमहोत्सव सोहळा पार पडत आहे. यादरम्यान, मोदी यांनी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, 50 वर्षांपूर्वी गुजरातमधील गावांनी जे रोप लावले होते ते आज मोठे वटवृक्ष झाले आहे. याशिवाय डबल इंजिन सरकारचे कौतुक करत मोदींनी म्हटले की, गुजरात राज्य सहकारी दूध उत्पादनात आघाडीवर आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये राज्यातील दूध महामंडळांची संख्या दुप्पट होऊन 12 वरुन 23 वर झाली आहे. याशिवाय डेअरी उद्योगाशी 36 लाखांहून अधिकजण जोडले गेले असून यामध्ये 11 लाख महिलांचा समावेश आहे.
जगात डेअरी क्षेत्रात भारत सर्वाधिक पुढे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, देशाला सर्वाधिक मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी डेअरी उद्योगाचे मोठे योगदान आहे. आज आपण जगातील सर्वाधिक मोठा दूध उत्पादक देश आहे. भारतात गेल्या 10 वर्षांमध्ये दूध उत्पादन क्षेत्रात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला जगात डेअरी क्षेत्रात दोन टक्के दराने वाढ होत आहे. पण भारतात डेअरी क्षेत्र सहा टक्के दराने वाढत आहे.
पंतप्रधानांचा गुरुवारचा कार्यक्रम
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.
- दुपारी महेसाणा येथे येणार आणि वलीनाथ महादेव मंदिरात पूजा-प्रार्थना करणार आहे.
- महेसणामधील तारभ येथे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून तयार केल्या जाणाऱ्या विकास कामांची पायाभरणी करणार आहेत.
- संध्याकाळी नवसारी येथे पोहोचणार आहेत. येथे 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केलेल्या विकास कामांची पायाभरणी करणार आहेत.
- संध्याकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी पंतप्रधान काकरापार अणुऊर्जा केंद्राला भेट देणार आहेत.
आणखी वाचा :
शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केल्याने AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले.…