जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच संविधान दिन साजरा, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

| Published : Nov 26 2024, 09:07 PM IST / Updated: Nov 26 2024, 09:39 PM IST

Narendra Modi
जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच संविधान दिन साजरा, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात भाषण केले. त्यांनी मुंबई हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण केली आणि दहशतवादावर निशाणा साधला. तसेच, गेल्या दहा वर्षातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालय परिसरात आयोजित 'संविधान दिवस' कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकशाहीच्या महत्वाच्या दिवसाबरोबरच आज मुंबईत लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याचा दिवस देखील आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचीही वर्षपूर्ती आहे.या हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादी कारवाया आणि त्यांच्या कार्यरत संघटनांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. ज्या पिडीत आणि त्यांच्या इच्छा आणि स्वप्नांबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्माते बोलले, त्यांना काळाबरोबर पुर्ण करण्याची मोहीम सुरू आहे.संविधान हे आपल्या वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक आहे. संविधानाने प्रत्येक वाईट काळात योग्य मार्ग दाखवला आहे. प्रत्येक गरज आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळेच आज पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये संविधान दिवस साजरा केला गेला आहे.

दहा वर्षातील सरकारच्या कामगिरीचा घेतला आढावा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील दहा वर्षात जे लोक बँकेच्या दरवाजापर्यंत पोहचू शकत नव्हते अशा ५३ कोटींपेक्षा जास्त भारतीयांचे बँकेत खाते उघडले आहे. जे लोक कित्येक पिढ्यांपासून बेघर होते, अशा ४ कोटी लोकांना मागील १० वर्षात पक्के घर मिळाले आहे. मागील १० वर्षात ज्या महिला आपल्या घरी गॅस पोहचण्याची वाट बघत होत्या अशा १० कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहे.

योजनांचे केले कौतुक

मोदी पुढे म्हणाले की, आपल्या संविधानात श्री राम, हनुमान, सीता, गुरु गोविंद, गौतम बुद्धांची प्रतिमा आहे कारण ते मानवी मुल्यांचे प्रतिक आहेत. ते म्हणाले की, आता वृद्धांना पेन्शनसाठी त्यांच्या हयातीची पडताळणी करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. सगळ्यांना इंद्रधनुष्य मिशनद्वारे लसीकरण, आयुष योजनेद्वारे गरीबांना पाच लाखांर्यंत मोफत उपचार मिळत आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत वीज नसलेल्या घरांमध्ये संध्याकाळ आणि रात्र अंधारात काढली जात होती. परंतु आता विपुल प्रमाणात वीज उपलब्ध आहे. ५जी कनेक्टिव्हिटीसह मोबाइल आणि इंटरनेट आधुनिक आहेत. ड्रोनमॅपिंग द्वारे गाव, घरे, जमीनींचे रेकॉर्ड आहेत. पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. १८ लाख कोटी रुपये खर्चाचे ३०-४० वर्षे जुने प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सांगितले होते की, ते स्वतःच्या हिताच्या आधी देशाचे हित अग्रस्थानी ठेवतील.

मोदी म्हणाले की संविधानाने मला जे काम दिले आहे मी त्यानुसारच काम केले आहे. मी माझ्या अधिकाराच्या मर्यादेत माझी जबाबदारी पार पाडली आहे. मी कोणाच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण केलेले नाही.