Budget Session : 'चला तुम्हाला शिक्षा देणार आहे', म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भाजप, विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत लंच (See Photos)

| Published : Feb 09 2024, 06:26 PM IST / Updated: Feb 09 2024, 06:29 PM IST

PM Modi Lunch

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनावेळी संसदेच्या कॅन्टीनमध्ये भाजप आणि विरोधी पक्षातील खासदारांसोबत लंच केले. याचे फोटो सध्या समोर आले आहेत.

PM Modi shares meal with MPs at Parliament canteen : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) अर्थसंकल्पाच्या अधिवेशनादरम्यान संसदेच्या कॅन्टीनमध्ये भाजप आणि विरोधी पक्षातील खासदारांसोबत लंच केले. याचे फोटो सध्या समोर आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खासदारांना दुपारी दीड वाजता लंचसाठीची सूचना मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा कॅन्टीनमध्ये पोहोचले असता त्यांनी खासदारांना 'माझ्यासोबत चला शिक्षा देणार आहे' असे म्हणत त्यांना लंचच्या टेबलकडे नेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजप खासदार हिना गावित, एस फांगनोन कोन्याक (S Phangnon Konyak), जामयांग सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal), एल. मुरुगन (L. Murugan), तेलुगू दसम पार्टी (TDP) खासदार राम मोहन नायडू, बहुजन समाज पार्टीचे (Bahujan Samaj Party) रितेश पांडे आणि बिजू जनता दल (Biju Janata Dal) खासदार सस्मित पात्रा उपस्थितीत होते. पंतप्रधान आणि खासदारांमधील लंच 45 मिनिटे सुरू होता. दरम्यान, लंच करताना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न देखील विचारले.

लंचमध्ये खिचडी आणि नाचणीच्या लाडूचे केले सेवन
पंतप्रधानांनी खासदारांनी म्हटले की, भात, डाळ, खिचडी आणि नाचणी, तिळाचे लाडूचे सेवन केले. लंचनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PMO यांना लंचच्या बिलाचे पेमेंट करण्यास सांगितले.

भाजपकडून सर्व खासदारांना व्हिप जारी
भाजपने शुक्रवारी (9 फेब्रुवारी) लोकसभा-राज्यसभेच्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. यामुळे समर्थनासाठी सर्व खासदारांनी 10 फेब्रुवारीला संसदेत उपस्थितीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : 

Bharat Ratna : पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि MS स्वामीनाथ यांना भारतरत्न देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

Haldwani Violence : 'आम्हाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला', महिला पोलीस कर्मचाऱ्याने सांगितली हिंसाचारावेळी घडलेली घटना

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवण्याची तयारी, अमित मालवीय यांनी आरोप लावत म्हटले.…