RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवण्याची तयारी, अमित मालवीय यांनी आरोप लावत म्हटले....

| Published : Feb 08 2024, 05:55 PM IST / Updated: Feb 08 2024, 06:02 PM IST

Amit Malviya on Congress

सार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवले जाऊ शकते. यावरुनच भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

Amit Malviya on Congress :  भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांना काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. रघुराम राजन यांना राज्यसभेत पाठवण्याच्या मुद्द्यावरुनच भाजपने (BJP) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी म्हटले की, काँग्रेसकडून फुटीचे राजकरण केले जात आहे.

अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर केली पोस्ट
अमित मालवीय यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मालवीय यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय मालवीय यांनी म्हटले की, 2 सप्टेंबर 2013 रोजी रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या संमिश्र विकास निर्देशांकांच्या विकासासाठी समितीचा अहवाल सादर करण्यात आला होता. यामध्ये कर्नाटकाचा हिस्सा 4.13 टक्क्यांवरुन 3.73 टक्के करावा असे म्हटले होते. खरंतर ही सिफारिश वित्त आयोगानी केली होती. हे सर्वकाही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार (UPA Government) अंतर्गत झाले होते.

कर्नाटकातील काँग्रेस सरकार आता आपल्याच सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहे. हे काहीही नसून फक्त काँग्रेसचे फुटीचे राजकरण असल्याचे अमित मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय मला सांगण्यात आलेय की, राहुल गांधी हे रघुराम राजन यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देऊ पाहत आहेत. पण काँग्रेसने हे आधी सांगावे की, अशा व्यक्तीचा सन्मान का करावा ज्याने कर्नाटकाचे हित धोक्यात आणले आहे?

आणखी वाचा : 

White Paper vs Black Paper : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 'ब्लॅक पेपर' काँग्रेसकडून जारी

RBI Monetary Policy : व्याजदरात बदल नाही, EMI आणि एफडी रिटर्नवर काय होणार परिणाम जाणून घ्या सविस्तर....

PM Modi in Parliament : अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील वाचा महत्त्वाचे मुद्दे