केंद्र सरकारकडून देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह यांच्यासह डॉ. एम.एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असून यासंदर्भातील पोस्ट देखील शेअर केली आहे.

Bhart Ratna : केंद्र सरकारने माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह यांच्यासह डॉ. एम.एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केली आहे.

चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न जाहीर 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौधरी चरण सिंह (Charan Singh) यांच्याबद्दल पोस्टमध्ये लिहिलेय, “आमच्या सरकारचे सौभाग्य आहे की देशाच्या माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुस्कार प्रदान केला जाणार आहे. हा सन्मान देशासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला समर्पित आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री राहिलेले असो किंवा देशाचे गृहमंत्री आणि एका आमदाराच्या रुपातही त्यांनी राष्ट्राच्या उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठाम राहिले. आपल्या शेतकरी भाऊ-बहिणींप्रती असलेले असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.”

Scroll to load tweet…

पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासंदर्भातील पंतप्रधानांची पोस्ट
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव (P. V. Narasimha Rao) यांना भारतरत्न देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, “हे सांगताना आनंद होतोय आपले माजी पंतप्रधान श्री. पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले जाणार आहे. एका राजकीय नेत्याच्या रुपात नरसिंह राव यांनी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना उत्तम पद्धतीने देशाची सेवा केली. त्यांनी आपल्या दूरदर्शी नेतृत्वाद्वारे भारताच्या आर्थिक प्रगती आणि समृद्धीमध्ये भूमिका बजावली. विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरले. पंतप्रधान या नात्याने नरसिंह राव यांनी भारताला जागतिक बाजारपेठेसाठी खुले केले, ज्यामुळे आर्थिक विकासाचे नवीन पर्व सुरू झाले.”

Scroll to load tweet…

डॉ. एम.एस स्वामीनाथन यांच्यासंदर्भातील पंतप्रधानांनी पोस्ट
डॉ. एम.एस स्वामीनाथन (Dr. M. S. Swaminathan) यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, डॉ. एम.एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आव्हानात्मक काळात त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वामीनाथन यांनी भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट कार्य केले. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट करण्यासह देशाची अन्नसुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली."

Scroll to load tweet…

मोदी सरकारने जिंकले शेतकऱ्यांची मन
चौधरी चरण सिंह आणि डॉ. एम.एस स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मन जिंकली आहेत. चौधरी चरण सिंह मोठे शेतकरी नेते होते. याशिवाय कृषी वैज्ञानिक डॉ. एम.एस स्वामीनाथन यांनी भारताच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वामीनाथन यांना भारताच्या 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून ओखळले जाते.

आणखी वाचा : 

White Paper vs Black Paper : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 'ब्लॅक पेपर' काँग्रेसकडून जारी

RBI Monetary Policy : व्याजदरात बदल नाही, EMI आणि एफडी रिटर्नवर काय होणार परिणाम जाणून घ्या सविस्तर....

PM Modi in Parliament : अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील वाचा महत्त्वाचे मुद्दे