सार

उत्तराखंडातील हल्द्वानी येथे बेकायदेशीर उभारण्यात आलेले मदरसा आणि मशीद पाडण्यावरुन हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. बुलडोझरच्या माध्यमातून अवैध अतिक्रमण हटवण्याचे काम केले जात असताना संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर दडगफेक करत वाहने जाळली.

Haldwani Violence : उत्तराखंडमधील (Uttarakhand) हल्द्वानी येथे गुरुवारी (8 फेब्रुवारी) अवैध मदरसा आणि मशीद पाडण्यावरुन हिंसाचार घडल्याची घटना घडली आहे. खरंतर अवैध अतिक्रम हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनावर दडगफेक करण्यास सुरुवात केली. याशिवाय वाहनांची जाळपोळ देखील केली. 

या प्रकारामुळे काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिने हिंसाचारात जो प्रकार पाहिला त्याबद्दल सांगितले आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्याने सांगितली हिंसाचारातील स्थिती
महिला पोलीस कर्मचाऱ्याने म्हटले की, “आम्ही हिंसाचारातून बचावलो आहेत. हिंसाचारावेळी दगडफेक होत असल्याने आम्ही एका घरात घुसलो. जवळ 15-20 जण आम्ही घरात घुसलो होतो. यानंतर घराबाहेरील व्यक्तींनी आग लावण्याचा आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही मोठ्या मुश्किलने लपत आमचा जीव वाचवत बाहेर पडलो. प्रत्येक गल्लीबोळ्यातून छप्परांवरुन दगडफेक करण्यात येत होती. ज्या घरात आम्ही होतो आणि ज्या व्यक्तीने आमचा जीव वाचवला त्याच्या घराचे दरवाजे, काचा फोडण्यात आल्या.”

शहरात संचारबंदी लागू
शहरातील हिंसाचाराची स्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री 9 वाजल्यापासून लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत तो कायम असणार आहे. याशिवाय शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पुष्कर धामींनी दिले कठोर कारवाईचे आदेश
उत्तराखंडातील हल्द्वानी येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची मुख्यमंत्री पुष्कर धामी (Pushkar Singh Dhami) यांनी गंभीर दखल घेतली आहे. धामी यांनी अशांतता निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नक्की काय घडले?
उत्तराखंड येथील हल्द्वानी जिल्ह्यातील वनभूलपुरा जवळील मलिकच्या बागेत अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांसह महापालिकेचे पथक केले होते. येथील अवैध नमाज स्थळ आणि मदरसे बुलडोझरच्या माध्यमातून पाडण्यास सुरुवात केली. यामुळे मुस्लिम महिला आणि तरुणांनी याचा विरोध केला. पाहता पाहता नागरिकांनी पोलीस आणि प्रशानसनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, नागरिकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी जखमी झाले आहेत. याशिवाय नागरिकांनी विरोध केल्यानंतरही अवैध अतिक्रमण हटवण्याचे काम सुरूच होते. नागरिकांना महापालिकेच्या पथकाने समाजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण नागरिकांनी दगडफेक करत संपूर्ण परिसर, पोलीस स्थानक घेरत वाहने जाळली.

आणखी वाचा : 

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवण्याची तयारी, अमित मालवीय यांनी आरोप लावत म्हटले....

White Paper vs Black Paper : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 'ब्लॅक पेपर' काँग्रेसकडून जारी

पेपर फुटीला आता बसणार चाप, लोकसभेत पारित झालेल्या विधेयकाबद्दल जाणून घ्या सविस्तर