PM Modi in Goa : भारतात पुढील पाच वर्षात उर्जा क्षेत्रात 67 अब्ज डॉलर्सची होणार गुंतवणूक, वाचा गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले

| Published : Feb 06 2024, 05:38 PM IST / Updated: Feb 06 2024, 05:43 PM IST

PM Modi in Goa
PM Modi in Goa : भारतात पुढील पाच वर्षात उर्जा क्षेत्रात 67 अब्ज डॉलर्सची होणार गुंतवणूक, वाचा गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गोव्या दौऱ्यावर आले होते. गोव्यात पंतप्रधानांनी गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1130 कोटी रुपयांहून अधिक योजनांचा शुभारंभ आणि पायाभरणी केली.

PM Modi in Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (6 फेब्रुवारी) गोव्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, भारतात पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये उर्जा क्षेत्रात (Energy Sector) जवळजवळ 67 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होईल. यावेळी जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांना भारताच्या विकासाचा भाग होण्यासाठी पंतप्रधानांनी आमंत्रित देखील केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यात ‘इंडिया एनर्जी वीक 2024’ (India Energy Week 2024) चे उद्घाटन केले. याशिवाय मोदींनी गोव्यात ऑइल अ‍ॅण्ड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) सी सर्व्हाइवल सेंटरचे (Sea Survival Center) उद्घाटन केले. 

जगातील तिसरी मोठी अर्थव्यस्था होणार भारत
गोव्यातील कार्यक्रमाला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, भारताची अर्थव्यस्था 7.5 टक्के दराने वाढत आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. नुकत्याच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) अंदाज लावला होता की, देश 7.5 टक्के दराने पुढे जाणार आहोत. देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक स्तरावरील कंपन्यांना भारतातील उर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले आहे. पुढे मोदींनी म्हटले की, देशात वर्ष 2030 पर्यंत आपली रिफाइनिंग क्षमता 254 दरवर्षी दशलक्ष मेट्रिक टनने वाढून 450 दरवर्षी दशलक्ष मेट्रिक टन होण्याची अपेक्षा आहे.

पाच वर्षात वाढणार 67 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
पंतप्रधानांनी म्हटले की, भारतातील उर्जा क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक केली जाणार आहे, जी याआधी कधीच झाली नव्हती. पुढील पाच-सहा वर्षांमध्ये भारतातील उर्जा क्षेत्रात 67 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय काही जागतिक घटना घडल्यानंतरही भारतात गेल्या दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत.

विकसित भारत, विकसित गोवा कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, गोव्याचे क्षेत्र आणि लोकसंख्या भले कमी आहे. पण सामाजिक विविधतेने नटलेले गोवा राज्य आहे. येथे वेगवेगळ्या समाजातील लोक, वेगळ्या धर्मातील लोक एकत्रित राहतात. याशिवाय गोव्यातील हेच नागरिक जेव्हा वारंवार भाजप सरकारला निवडते त्यावेळी याचा संदेश संपूर्ण देशभराला मिळतो असेही मोदींनी गोव्यात बोलताना म्हटले आहे.

रोपवे मुळे गोव्यातील पर्यटन वाढणार
गोव्यात रोपवे (Ropeway) तयार झाल्यानंतर येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल.आमचे सरकार गोव्याला एका नव्या प्रकारे पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

'संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्किट खायला लावू शकले नाहीत', आसामच्या मुख्यमंत्र्यांनी VIRAL VIDEO वरून साधला निशाणा

Uttarakhand UCC Bill : मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्याकडून समान नागरी कायद्याचे विधेयक विधानसभेत सादर, लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल मांडलाय हा मुद्दा

Lok Sabha Elections 2024 : निवडणूक प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करण्यास राजकीय पक्षांना बंदी, निवडणूक आयोगाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना