'संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्किट खायला लावू शकले नाहीत', आसामच्या मुख्यमंत्र्यांनी VIRAL VIDEO वरून साधला निशाणा

| Published : Feb 06 2024, 04:27 PM IST / Updated: Feb 06 2024, 05:16 PM IST

Rahul Gandhi

सार

राहुल गांधींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, “केवळ राहुल गांधीच नाही तर संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्कीट खाऊ घालू शकले नाही.

Assam CM Himant Biswa Sarma reacts on Rahul Gandhi's Viral Video : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींनी (Rahul Gandhi) कुत्र्याचे बिस्कीट माणसाच्या हातात दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पल्लवीसीटी नामक एका एक्स युझरने शेअर केला आहे. त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himant Biswa Sarma) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, “केवळ राहुल गांधीच नाही तर संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्कीट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी ते खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला."

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका कुत्र्याच्या पिल्लाला बिस्कीट खायला घालताना दिसत आहेत आणि नंतर कुत्र्याने नाकारलेले तेच बिस्किट पक्षाच्या एका समर्थकाच्या हातात देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी उघड्या जीपवर बसलेले दिसत आहेत. या जीपवर एक कुत्राही आहे. राहुल गांधींच्या एका हातात बिस्किटांचे पॅकेट आहे. राहुल गांधी यांच्याभोवती समर्थकांची गर्दी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

कुत्र्याने न खाल्लेले बिस्कीट कार्यकर्त्याला

व्हिडिओमध्ये राहुल गांधीनी हातातल्या पॅकेटमधून बिस्किट काढले. ते बिस्कीट त्यांनी कुत्र्यासमोर ठेवले. परंतु त्याने ते बिस्कीट खाल्ले नाही. त्याने फक्त ते शिवले. हे पाहून पुढच्याच क्षणी राहुल गांधींनी तेच बिस्किट उचलले आणि समोर उपस्थित असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या हातात दिले.

कार्यकर्त्यानेही ते बिस्कीट घेतले व राहुल गांधींबरोबर हस्तांदोलन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांनाही कुत्र्याच्या ताटातून उचलून बिस्किट देण्यात आले होते

पल्लवीसीटी नावाच्या एका एक्स युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. याबरोबरच पल्लवीसीटी या युझरने पुढे लिहिले की, “ राहुल गांधींनी आसामचे ज्येष्ठ नेते हिमंता बिस्वा सरमा यांनाही कुत्र्याच्या ताटातून बिस्किट दिले होते.” 

पल्लवीसीटीने शेअर केलेल्या व्हिडिओवर हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोस्ट केले, “पल्लवी जी, केवळ राहुल गांधीच नाही तर संपूर्ण कुटुंब मला ते बिस्कीट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी ते खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला.” या घटनेनंतर हिमंता बिस्वा सरमा (Himant Biswa Sarma) यांनी काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता व पुढे ते आसामचे मुख्यमंत्री झाले.

अमित मालवीय म्हणाले- असा पक्ष लुप्त होणे स्वाभाविक आहे

दरम्यान, भाजप नेते अमित मालवीय यांनीही X वर राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखी वागणूक दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस नेत्यावर निशाणा साधला. मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे वागवतात तो पक्ष नामशेष होणे स्वाभाविक आहे”.

आणखी वाचा -

अरविंद केजरीवालांवर ईडीची मोठी कारवाई, खासगी सचिव, आप नेत्यांच्या घरांवर धाड टाकली

किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचे निदान झाल्याची बॅकिंघम पॅलेसची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृती सुधारण्यासाठी केली प्रार्थना

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया