भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ॲडम्स ब्रिजच्या बुडलेल्या संरचनेचे यशस्वीरित्या मॅप केले आहे, ज्याला राम सेतू म्हणूनही ओळखले जाते, हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्राचीन पूल भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेखित आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये बुधवारी सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. लखनौ आग्रा एक्स्प्रेस वेवर सकाळी स्लीपर बस आणि टँकरमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात एका लहान मुलासह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
Budget 2024 : सरकारी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एक कोटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खुशखबर देऊ शकते. अर्थात ही घोषणा नवीन वेतन आयोगासंदर्भातील आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास कदाचित सप्टेंबर महिना लागू शकतो.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेवरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. ही संघटना भारतात हिंसाचार, अशांतता आणि फुटीरता पसरवण्यात गुंतलेली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मंगळवारी रायबरेली येथे पोहोचले. त्यांनी प्रथम बछरावन गावातील चुरवा हनुमान मंदिर गाठले आणि बजरंगबलीची पूजा केली.
बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. सत्ताधारी शिवसेना नेते राजेश शहा यांचा २४ वर्षीय मुलगा मिहीर शाह याने ७ जुलैला पहाटे साडेपाच वाजता स्कूटरवरून मासे खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या जोडप्याला धडक दिली.
भारताच्या सरन्यायाधीशांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका मंजूर केली आहे. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
PM Modi in Russia : राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे म्हणणे मान्य करत रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय तरुणांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
वसंत मोरे हे परत एकदा दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे दिसून आले आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून सुरुवातीला मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला.
विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी आसाम आणि मणिपूरचा दौरा केला. मणिपूर हिंसाचार आणि आसाम पूरग्रस्तांना भेटण्यासाठी राहुल गांधी येथे आले आहेत. मणिपूरमधील हिंसाचारामुळे 67 हजार लोक विस्थापित झाले आहेत.