टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) २०२६ पर्यंत सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर लक्ष केंद्रित करत असून भविष्यातील उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित कामासाठी सज्ज होत आहे.
देशात आज 26 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, हा दिवस भारतीय सैन्याचे धाडस, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. याच निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या सपूतांना आदरांजली वाहिली आहे.
मुंबई - १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले कारगिल युद्ध हे आधुनिक भारताच्या लष्करी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व तेजस्वी पर्व आहे. हे युद्ध जम्मू-काश्मीरमधील कारगिल एलओसी जवळ झाले होते. आज या युद्धाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
26th July 2025 Updates : इस्रोचे येत्या 30 जुलैला मिशन निसार पार पडणार असल्याची माहिती इस्रोचे चेअरमन डॉ. वी नारायण यांनी दिली आहे. याशिवाय कारगिल युद्धा शहीद झालेल्या भारताच्या जवानांना आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली जात आहे. तर महाराष्ट्रातील पालघरमध्ये आज मुसळधार पावासाचा अंदाज आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच ताज्या घडामोडी एशियानेट न्यूजवर एका क्लिकवर वाचा.
मुंबई : १९९९ मध्ये पाकिस्तानला हरवून युद्धात शहीद झालेल्या भारताच्या वीरांना सलाम करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गेल्या दोन दिवसांत विविध केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. राज्यातील विकास प्रकल्पांसाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री मनोहर लाल खट्टर आणि नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
नवी दिल्ली - भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास स्पष्टपणे दिसून येत असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाचे प्रति व्यक्ती उत्पन्न वाढून ₹1,14,710 इतके झाले आहे. ही माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात दिली आहे.
राजस्थानमधील झालावाड येथे आज सकाळी शाळेची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
महादायी योजनेबाबत गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना माहिती नाही. ते मानसिक संतुलन गमावून बोलत आहेत, असा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला आहे.
सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, “१८ वर्षे ही वयोमर्यादा अनेक कायद्यांमध्ये ठरवून दिली गेली आहे. ती मुलांच्या शरीरिक स्वातंत्र्याचे रक्षण करते. त्यामुळे यामध्ये कोणताही बदल कोर्टाने करू नये.”
India