भारत 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी aamantran.mod.gov.in वर तिकीट बुक करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान आहेत. त्यांच्या पाचवर्षीय कार्यकाळात, त्यांनी स्वातंत्र्य दिनी दिलेल्या भाषणांची कालावधी आणि त्यांच्या विविध पोशाखांमध्ये कसा बदल झाला आहे, हे जाणून घेऊयात.
अल्पवयीन अनुयायी बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना ७ दिवसांचा जामीन मंजूर झाला आहे. गेल्या ११ वर्षात त्यांना जामीन मिळण्याची ही पहिलीच वेळ असून पुण्यातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पॅरोल देण्यात आला आहे.
पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन धारेवर धरले आहे. जमीन मालकाला योग्य मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजनेवर बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.