सकाळचा आढावा : मुंबईत मुसळधार पाऊस, जनजिवन विस्कळीत, शाळा कॉलेज बंद, ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, सकाळी ८ वाजेपर्यंतच्या ५ मोठ्या बातम्या जाणून घेऊया.
मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालये बंद
मुंबईत मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. हवामान खात्याने आजही रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिस्थिती पाहता बीएमसीने खबरदारी म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जेष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बहुमोल ठेवा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी निधन झाले. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज अजित डोवाल यांची भेट घेणार
भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी मंगळवारी एनएसए अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते सीमावादावर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयानुसार, ही भेट मंगळवारी सकाळी ११ वाजता विशेष प्रतिनिधी पातळीवर होईल.
दिल्लीत पूर अलर्ट, धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहे यमुना
दिल्लीत गेल्या काही दिवसांत जास्त पाऊस पडला नसला तरी यमुना नदीची पातळी सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता यमुनेची पातळी २०५.९१ मीटर नोंदवली गेली, जी धोक्याच्या पातळीजवळ आहे. याचे मोठे कारण हरियाणातील हथिनी कुंड बंधाऱ्यातून सोडलेले लाखो क्यूसेक पाणी आहे. दर तासाला सुमारे ४५ हजार क्यूसेक पाणी दिल्लीकडे येत आहे, ज्यामुळे राजधानीत पुराचा धोका वाढला आहे.
हिमाचलच्या कांगड्यात ३.९ तीव्रतेचा भूकंप, घराबाहेर पडले लोक
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात सोमवारी रात्री ९:२८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ होती आणि त्याचे केंद्र धर्मशाळापासून सुमारे २३ किलोमीटर अंतरावर, १० किलोमीटर खोलीवर होते. अचानक धक्के जाणवल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. दिलासादायक बाब म्हणजे या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
मनिका विश्वकर्मा मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ झाल्या
मनिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला आहे. राजस्थानच्या गंगानगरच्या रहिवासी आणि दिल्लीत मॉडेलिंग करत होत्या. मनिका आता ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

