राजस्थानमध्ये दागिन्यांवरून झालेल्या वादात एका ३० वर्षीय सैनिकाने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. पत्नीने तिच्या वहिनीचे दागिने घातल्याचे पाहून पती संतापला होता, जे दागिने त्याच्या कुटुंबाने विकल्याचे सांगितले होते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी आता वैयक्तिक आर्थिक गरजांसाठी खात्यातून काढता येणारी रक्कम ₹50,000 वरून ₹1 लाख पर्यंत वाढवली आहे. नवीन नियमांनुसार, सहा महिने नोकरी पूर्ण नसलेले कर्मचारी देखील रक्कम काढू शकतात.
बंगळुरुमधील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये VIP बाथरुमची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बाथरुमचा वापर करण्यासाठीची अट अशी की, ग्राहकाने कमीतकमी हजार रुपयांची खरेदी केलेल्याचे बिल असावे.
शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या होत्या, परंतु भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे.
कोलकातामधील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या हत्येच्या प्रकरणातील प्राथमिक तपास आणि प्रशासनाने दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत. पोलीस व रुग्णालयातील प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून आल्याचा आरोपही डॉक्टरांनी लावला.
मॉडेलचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी विशाल गुन्नी यांना निलंबित केले आहे. तपासादरम्यान मॉडेलला धमकावण्यात आणि छळण्यात गुन्नी यांची भूमिका असल्याचे उघड झाले आहे.
PM Modi Birthday Special : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 सप्टेंबर) आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील दहा मोठ्या निर्णयांबद्दल जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी असून ते ७४ वर्षांचे झाले आहेत. या निमित्ताने आपण त्यांच्या आवडत्या घड्याळाबद्दल जाणून घेऊयात ज्याची किंमत ४० हजारांपासून सुरू होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साधी राहणी आणि उत्तम खानपान आवडते. शेवग्याची भाजी, ढोकळा, आंबा लोणचे, खांडवी, खिचडी आणि श्रीखंड हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत.
अदानी समूहाने सौर, पवन आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांमध्ये ₹4.05 लाख कोटी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक 2030 पर्यंत पूर्ण केली जाईल आणि यातून 71,100 लोकांना रोजगार मिळेल.
India