पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते आहेत. नरेंद्र मोदी यांनी सातत्याने तिसऱ्यांदा सत्तेची सूत्र हाती घेत माजी पीएम जवाहरलाल नेहरु यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम 2014 मध्ये केंद्रात सत्ता सांभाळली. यानंतर वर्ष 2019 ते आतापर्यंत मोदी यांनी पंतप्रधान पदाची कमान सांभाळी आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात काही ऐतिहासिक निर्णयही घेतले. याच निर्णयांबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊया...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राम मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला. 22 जानेवारी 2024 रोजी रामलला आपल्या गर्भगृहात विराजमान झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या ऐतिसाहिक निर्णयात तिहेरी तलाकचाही समावेश आहे. केंद्र सरकारने मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकच्या प्रथेतून मुक्त केले.
पीएम मोदी यांच्या कार्यकाळातील तिसरा सर्वाधिक ऐतिसाहिक निर्णय जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा आहे. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळत होता.
मोदी सरकारने ऐतिसाहिक पाऊल उचलत लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले.
2 ऑक्टोंबर 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. या अभिनायाचा देशातील नागरिकांना मोठा फायदा झाल आहे.
गंगा नदीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी मोदी सरकारने नमामि गंगे योजनेची सुरुवात केली होती. या योजनेमुळे गंगा आणि अन्य नद्यांचे अस्तित्व आजही टिकून राहिले आहे.
मोदी सरकारने वन रँक वन पेंशनला मंजूरी देत माजी सैनिकांना मोठा दिलासा दिला होता. या अंतर्गत सशस्र बलातील जवानांना एकसमान पेंशन दिली जाते.
जन धन योजनेअंतर्गत लाखोंच्या संख्येने गरिबांची खाती सुरु करण्यात आली आहेत.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार फ्री मध्ये केले जातात. वर्ष 2024 मध्ये तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय घेतला होता.
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून तीनदा दोन-दोन हजार रुपये जमा केले जातात.