सार
कोलकातामधील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या हत्येच्या प्रकरणातील प्राथमिक तपास आणि प्रशासनाने दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत. पोलीस व रुग्णालयातील प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून आल्याचा आरोपही डॉक्टरांनी लावला.
Kolkata Case : कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात अद्याप आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात नुकत्याच ट्रेनी डॉक्टर्सच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. या दोघांमध्ये दोन तासांची बातचीत झाली. खरंतर, ट्रेनी डॉक्टरच्या हत्येप्रकरणात पहिल्याच दिवशी झालेल्या काही चुकांमुळे डॉक्टरांनी राज्य सरकारला निशाण्यावर धरले होते. जाणून घेऊया अशी 10 कारणे ज्यामुळे ममता बॅनर्जींना विरोधाचा सामना करावा लागला.
- आरजी कर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह 9 ऑगस्टला कॅम्पसच्या सेमीनार हॉलमध्ये सापडला. डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. पण कॉलेज प्रशासनाने याला आधीच आत्महत्या असल्याचे वळण देण्याचा प्रयत्न केला.
- ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडल्याच्या खूप वेळानंतर मेडिकल कॉलेज प्रशासनाने पोलिसांना सूचना दिली होती. सूचनेतही अस्पष्ट माहिती दिली गेली.
- नातेवाईकांना फोनवरुन योग्य माहिती देण्यात आली नाही.
- घटनेबद्दल कळल्याच्या खूप वेळानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमधील अधिकारी पोहोचले. कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 03 मिनिटांनी पोलीस अधिकारी अभिजीत मंडल यांना फोन केला होता. पण याच्या एका तासानंतर मंडल घटनास्थळी आले होते.
- सुरुवातीला सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरंतर, पोलिसांच्या जीडीमध्ये कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले होते. सेमीनार हॉलमध्ये मृतदेह सापडला होता. मृतदेह पाहून स्पष्टपणे कळून येत होते की, डॉक्टरवर बलत्कार केल्यानंतर हत्या करण्यात आली आहे. पण सत्य सांगण्यात आले नाही.
- बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपी संजय रायला घटनेच्या काही तासांनी अटक करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. पण संबंधित कायद्यानुसार काही केलेले नव्हते. एवढेच नव्हे मुख्य आरोपी संजय रायचे कपडे आणि अन्य साक्षीदारांनाही दोन दिवस ताब्यात घेतले नव्हते. यामुळे पोलिसांनी प्रकरणात वेळखाऊपणा केल्याचा आरोप लावण्यात आला.
- गुन्ह्याचा सीन सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी हलगर्जीपणा केला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. खरंतर, पोलिसांनी क्राइम सीन गुपित ठेवणे आवश्यक होते.
- मृत डॉक्टरांच्या पालकांनी असा आरोप लावला होता की, रुग्णालयाच्या प्रशासनाने आधी चुकीची माहिती दिली. याला आत्महत्या असल्याचे सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर नातेवाईकांची अडवणूक करण्यात आली. शवविच्छेदन रिपोर्टसह मृत्यूपत्र देण्यासही वेळ लावल्याचा आरोप लावला गेला.
- ममता बॅनर्जींनी आर्थिक मदत देऊ केल्याच्या घोषणेवरही टीका करण्यात आली. घटनेनंतर नागरिकांमधील आक्रोष वाढल्यानंतर ममता बॅनर्जींनी पीडित नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करु असे आश्वासन दिले. यावरही टीका झाली.
- आंदोलन करणाऱ्या डॉक्टर्सवर बाहेरच्या नागरिकांनी हल्ला केला. यामुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत राहिले. 14 ऑगस्टच्या रात्री मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ज्युनियर डॉक्टर्सकडून आंदोलन करण्यात येत होते. यावेळी बाहेरच्या नागरिकांनी आंदोलक डॉक्टरांचा वेष धारण करत कॅम्पसमध्ये तोडफोड केली. डॉक्टरांना मारहाण आण पोलिसांवर दगडफेक केली. जमावाने क्राइम सीनला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही लावला गेला.
आणखी वाचा :
कोण आहे विशाल गुन्नी?, धक्कादायक कारणावरुन वरिष्ठ IPS अधिकारी निलंबित
PM Modi Birthday Special : पंतप्रधानांच्या दशपूर्तीमधील 10 मोठे निर्णय