सार

मुंबई इंडियन्स संघातील तीन खेळाडूंचे स्थान टी 20 वर्ल्डकपमध्ये झाले असून विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन किंवा केएल राहुल यांची निवड केली जाणार आहे. 

भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्माच्या कर्णधारपदात टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत. यामधील पहिला सामना हा 5 जूनला आयर्लंडच्या विरुद्ध खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेल्या तीन खेळाडूंची आधीच या संघात निवड झाली आहे. त्यामुळे आता कोणाची निवड केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून लागून राहिले आहे. 

शिवम दुबेची विश्वचषकात केली जाणार निवड - 
अष्टपैलू खेळाडूंमध्ये खरी लढत होणार असून यामध्ये हार्दिक पांड्याच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूची निवड केली जाईल असे सांगितले जात आहे. या खेळाडूचे नाव शिवम दुबे असे असून त्याने अजून आयपीएलमध्ये एकही षटक न टाकल्यामुळे त्याच्या नावाच्या चर्चेला बळ मिळालेलं दिसत नाही. विकेटकिपर म्हणून खेळाडूंमध्ये स्पर्धा असून यामध्ये ईशान किशन, संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या नावामध्ये खासकरून स्पर्धा आहे. 
 

संजू सॅमसन विकेटकिपर म्हणून केली जाणार निवड -
संजू सॅमसनची विकेटकिपर म्हणून निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. त्याने लखनऊ संघाच्या विरुद्ध केलेल्या खेळीमुळे त्याची निवड होईल हे जवळपास तरी नक्की झाले आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांची निवड केली असून यामधून एकाची विकेटकिपर म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन हा यामध्ये उजवा ठरत असून त्याची निवड केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. इशान किशनची मुंबई इंडियन्स संघात असताना कधी बॅट चालते तर कधी नाही. त्यामुळे त्याबाबत काय केलं जाते हे पाहिलं जाणार आहे. 
आणखी वाचा - 
हुबळी नेहा हत्या प्रकरण: न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर जस्टिस फॉर नेहा आणि सेव्ह हिंदू गर्ल असे बॅनर लावून केली न्यायाची मागणी
अमोल कोल्हे शिवाजीराव आढळरावांच्या परत पडले पाया, हे पाहून आढळरावांनी कोल्हेंचे धरले...