Mynmar Army Aircraft Crashes : लेंगपुई विमानतळावर मान्यमार सैन्याच्या विमानाला अपघात, सहा जण जखमी

| Published : Jan 23 2024, 01:50 PM IST / Updated: Jan 23 2024, 01:53 PM IST

सार

मिझोराममधील लेंगपुई विमानतळाच्या धावपट्टीवरुन मान्यमार सैन्याच्या मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. विमानातून पालयटसह 14 जण प्रवास करत होते.

Mynmar Army Aircraft Crashes : मिझोराममधील (Mizoram) लेंगपुई (Lengpui Airport) विमानतळाच्या धावपट्टीवरुन मान्यमार सैन्याच्या मालवाहू विमानाचा अपघात झाला आहे. विमानत पायलटसह 14 जण होते. दुर्घटनेत सहाजण जखमी झाले असून त्यांना लेंगपुई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मान्यमार सैन्याच्या विमानाने लेंगपुई विमाताळवर लँडिंग केले होते. टर्मिनलवर पोहोचण्याआधीच विमान धावपट्टीवरुन घसरले आणि दरीत कोसळले गेले. अपघातामुळे विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्यमार सैन्य आणि नागरी सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाच्या कारणास्तव लॉंगटलाय (Lawngtlai) जिल्ह्यातून पळ काढलेल्या सैनिकांना परत आणण्यासाठी हे विमान आले होते. म्यानमारचे सैनिक सीमा पार करुन भारतात आले होते. मिझोराममधील लेंगपुई विमानतळावर लँडिंग केल्यानंतर विमान धावपट्टीवर घसरले गेल्याने अपघात झाला. 

गेल्या आठवड्यात 276 म्यानमारचे सैनिक आले होते भारतात
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एकूण 276 म्यानमारचे सैनिक भारतात घुसले होते. सोमवारी (22 जानेवारी) यापैकी 184 जणांना परत पाठवण्यात आले होते. मान्यमार सैन्याच्या विमानाने त्यांना लेंगपुई विमातळावरुन नेण्यात येत होते. अन्य सैनिकांना घेण्यासाठी विमान मंगळवारी सकाळी आले असता त्याचा अपघात झाला.

आणखी वाचा : 

Viral Video : कंपनीच्या कार्यक्रमात CEO नी घेतली हिरोसारखी एण्ट्री, पाहा पुढे नक्की काय घडले.....

राम मंदिर प्रसादाच्या नावाखाली Amazon कडून नागरिकांची फसवणूक, सरकारने नोटीस धाडत मागितले उत्तर

Vadodara Boat Capsize : वडोदरा येथील तलावात बोट उलटल्याने 14 जणांचा मृत्यू, 18 जणांच्या विरोधात FIR दाखल