सार

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून एक नोटीस धाडण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनला ही नोटीस नागरिकांची राम मंदिर प्रसादाच्या नावाखाली दिशाभूल केल्यामुळे धाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Ram Mandir Prasad : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉन (Amazon) कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून (Central Consumer Protection Authority) एक नोटीस धाडण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनला ही नोटीस नागरिकांची राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली दिशाभूल केल्यामुळे धाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अ‍ॅमेझॉन कंपनीने राम मंदिराच्या प्रसादाचा टॅग लावून मिठाई विक्री करण्यास सुरुवात केली होती. अशातच अ‍ॅमेझॉनला सरकारने नोटीस धाडली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले की, नागरिकांची दिशाभूल करुन राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली मिठाईची विक्री केली जात आहे. यामुळेच कंपनीला नोटीस धाडली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून तक्रार दाखल
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून (Confederation of All India Traders) अ‍ॅमेझॉनकडून राम मंदिराच्या प्रदासाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करत मिठाईची विक्री केली जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अ‍ॅमेझॉनला नोटीस धाडस सात दिवसांमध्ये उत्तर मागितले आहे.

 कंपनीने नोटीसला उत्तर न दिल्यास कठोर कार्यवाही केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय कंपनीच्या विरोधात ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या विरोधात कार्यवाही केली जाऊ शकते.

अ‍ॅमेझॉनवर होतेय नागरिकांची दिशाभूल
अ‍ॅमेझॉनवर काही प्रकारच्या मिठाई आणि खाद्य प्रोडक्ट्स राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली विक्री केले जात असल्याचेही ग्राहक प्राधिकरणाचा लक्षात आले आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉनवर श्रीराम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली लाडू, पेढ्यांसह अन्य काही प्रोडक्ट्सची विक्री केली जात आहे. 

अथॉरिटीने हे देखील म्हटले की, अयोध्या राम मंदिराशी संबंधित नसलेले प्रोडक्ट्स देखील अ‍ॅमेझॉनवर विक्री केले जात आहेत. याच कारणास्तव अ‍ॅमेझॉनला नोटीस धाडत आठवड्याभरात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा कंपनीच्या विरोधात भारतीय कायद्याअंतर्गत कार्यवाही केली जाऊ शकते. 

आणखी वाचा : 

IndiGoचे प्रवासी चक्क रनवे वर जेवले, मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांसह इंडिगो कंपनीला केंद्राने धाडली नोटीस

ना माचिस...ना लायटर, तरुणाने चक्क बोटाने पेटवला गॅस (Watch Viral Video)

या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा