drought management

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ही समिती दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामे अचूक होणे, पुढील वर्ष-दीड वर्षासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांचा चारा आणि रेशनचे अन्न उपलब्ध करून देण्यासह विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे. समिती दर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता बैठक घेऊन आठवड्याच्या उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. विरोधकांनी दुष्काळासारख्या गंभीर विषयावर राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. केंद्राच्या NDRF निकषांनुसार प्रस्ताव पाठवले जातील; मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या उपाययोजना सुरू करेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Related Video