Lok Sabha Security Breach : चार वर्षांपासून सुरू होता कट, घटनेसंबंधित समोर आली ही महत्त्वाची माहिती

| Published : Dec 14 2023, 10:43 AM IST / Updated: Dec 14 2023, 02:50 PM IST

lok sabha  attack news

सार

Lok Sabha Security Breach Update: लोकसभेच्या उच्च सुरक्षिततेचा भंग केल्या प्रकरणाचे तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पाच लोकांना ताब्यात घेतले असून एका आरोपीने पळ काढला आहे.

Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी सेलने (Anti Terrorist Cell) आतापर्यंत सहा लोकांची चौकशी केली आहे. एवढेच नव्हे आरोपींच्या विरोधात युएपीए अंतर्गत (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंबंधित पुढील काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत

  • या घटनेमध्ये एकूण सहा लोकांचा समावेश आहे. त्यापैकी सागर शर्मा, मनोरंजन डी यांनी लोकसभेच्या सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर सोडला होता. नीलम देवी आणि अमोल शिंदे यांनी लोकसभेच्या बाहेर धूर सोडला होता. या सर्वांना ताब्यात घेतले आहे.
  • अटक करण्यात आलेल्या अन्य लोकांमध्ये ललित झा आणि विकी शर्मासह गुरुग्राममधील अन्य दोन लोकांचा या प्रकरणात समावेश आहे. ललित झा वर व्हिडीओ तयार केल्याचा आरोप लावण्यात आला असून अन्य लोक स्मोक कॅण्डल (Smoke Candle) फेकत होते. विकी शर्माने या सर्वांना राहण्यासाठी जागा दिली होती.
  • दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हटले की, सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले होते. या ग्रुपचे नाव ‘भगत सिंग फॅन ग्रुप’ (Bhagat Singh Fan Group) असून सर्वजण त्या ग्रुपमधील आहेत.
  • हे सर्वजण दीड वर्षांपूर्वी म्हैसूर (Mysuru) येथे भेटले होते. त्याचवेळी या घटनेचा प्लॅन केला होता. याच दरम्यान दुसरी भेट त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी केली होती. यावेळी प्रत्येकाने काय करावे हे ठरवण्यात आले होते.
  • आरोपी अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील (Maharashtra) असून त्याच्याकडे स्मोक कॅण्डलची जबाबदारी होती. अमोलनेच इंडिया गेटच्या येथे झालेल्या भेटीदरम्यान सर्वांना स्मोक कॅण्डल दिल्या.
  • सर्व सहा जणांना लोकसभेच्या आत जायचे होते. पण सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांना आतमध्ये जाण्याची परवानगी मिळाली. यामुळेच दोघांना सभागृहातून ताब्यात घेतले गेले.
  • लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच स्मोक कॅण्डल फेकण्यात आल्याने संपूर्ण सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर पसरला गेला. दोघांनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या होत्या. खरंतर सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांना सभागृहाच्या सभापतींच्या खुर्चीजवळ जायचे होते.
  • सभागृहात दोघांनी उड्या मारल्यानंतर काही खासदारांनी त्यांना पकडले. तर संसदेच्या बाहेर नीलम आणि अमोल यांनी स्मोक कॅण्डल जाळल्या.
  • दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी सेलकडून आरोपींची चौकशी केली जात आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुन्हा कामकाज सुरू केले. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे बिर्ला यांनी खासदारांना सांगितले.

 

आणखी वाचा: 

VIDEO : संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक, प्रेक्षकांच्या गॅलरीतून अज्ञातांनी मारल्या उड्या

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेमध्ये सर्वात गंभीर चूक

CM Salary : भारतातील या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार माहितेय का?