संसदेच्या सुरक्षेमध्ये सर्वात गंभीर चूक, प्रेक्षकांच्या गॅलरीमधून दोघांनी उड्या मारल्या. शिवाय पिवळ्या रंगाचा धूरही सोडला, हे पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले.
India Dec 14 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:x
Marathi
खासदारांनी दोघांना पकडले
13 डिसेंबर 2023रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षकांच्या गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली व पिवळ्या रंगाचा धूर सोडला.
Image credits: x
Marathi
धुरामुळे डोळ्यांची होऊ लागली जळजळ
सभागृहात उडी मारून पिवळ्या रंगाचा धूर या लोकांनी सोडला. धुरामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागल्याने खासदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Image credits: x
Marathi
तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
सभागृहात उडी मारणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सागर असल्याचे म्हटले जात आहे.
Image credits: x
Marathi
महिलेकडून घोषणाबाजी
संसदेबाहेर ही महिला देखील 'हुकूमशाही बंद करा' अशी घोषणाबाजी करत होती.
Image credits: x
Marathi
संविधान वाचवा, अशीही घोषणाबाजी या महिलेकडून केली जात होती.