सार
New Delhi : लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच मोठी चूक घडली. कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.
Unidentified Man Jumps In Lok Sabha : लोकसभेचे कामकाज सुरू असताना सुरक्षेमध्ये मोठी चूक घडली. यावेळी दोन व्यक्तींनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. यामुळे लोकसभेचे कामकाज तातडीने थांबवावे लागले.
संसदेच्या खासदारांनी म्हटले की, उडी मारणाऱ्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचा धूर सोडला. यामुळे डोळे चुरचुरण्यास सुरुवात झाल्याचे खासदारांनी पुढे म्हटले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
हुकूमशाही बंद करण्याच्या घोषणा
पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर बाहेर जाताना त्यांनी हुकूमशाही बंद करा अशा घोषणा दिल्या. यामध्ये एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. महिलेने 'जय भीम, जय भारत , संविधान वाचवा, हुकूमशाही बंद करा' अशी घोषणाबाजी केली.
लोकसभेच्या सुरक्षिततेत मोठी चूक
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सदान घडलेल्या या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, "दोन व्यक्तींनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या आणि त्यांनी अचानक पिवळ्या रंगाचा धूर सोडला. या दोन व्यक्तींना खासदारांनी पडकले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ताब्यात दिले."
आणखी वाचा:
CM Salary : भारतातील या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार माहितेय का?
Article 370 : या न्यायाधीशांनी कलम 370 वर सुनावला ऐतिहासिक निर्णय
श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 3 हजार VVIPना आमंत्रण, यादीत आहेत ही मोठी नावं