सार

Amethi : उत्तर प्रदेशातील अमेठी येथे काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची दारुच्या नशेत असलेल्या काहीजणांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सुप्रिया श्रीनेत यांनी संतप्त शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Uttar Pradesh : ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या अमेठीतील कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात काँग्रेसने आरोप लावत म्हटले की, कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांवर हल्ला करण्यासह तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी घटनास्थळी गदारोळही घातला.

सदर घटना गौरीगंज येथील आहे. काँग्रेस नेत्यांनी म्हटले की, वाहनांची तोडफोड करण्यात आली तेव्हा नेतेमंडळी कार्यालयात होते. सध्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय.

काँग्रेसने भाजपावर लावला आरोप
काँग्रेस नेत्यांनी कार्यालयाबाहेर वाहनांच्या तोडफोडच्या प्रकाराचा आरोप भाजपावर लावला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांकडून अज्ञात व्यक्तींकडून एफआयआर दाखल केला आहे.

सुप्रिया श्रीनेत यांची संतप्त प्रतिक्रिया
काँग्रेसच्या सोशल मीडिया चेअरपर्सन सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले की, अमेठीत काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. यावर पोलिसही आधी शांत बसले. सध्या वाऱ्याची दिशा बदलली आहे. वाहनांची तोडफोड करून काहीही होणार नाही.

पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन
गौरीगंज पोलीस स्थानकाचे शिवाकांत तिवारी यांनी म्हटले की, काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारावरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या पुरावे जमा केले जात आहेत. घटनेत सहभागी असलेल्यांची माहिती मिळाल्यास योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे.

आणखी वाचा : 

मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारीची BJP मध्ये एण्ट्री, पाहा काय म्हणाली...

आता युपीमध्ये कुठे गुंडाराज आहे हे दाखवून द्यावं, उत्तर प्रदेशच्या मुलीने भाजप सरकारचे कौतुक करताना विरोधकांवर केली टीका