मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारीची BJP मध्ये एण्ट्री, पाहा काय म्हणाली...

| Published : May 06 2024, 09:07 AM IST / Updated: May 06 2024, 09:15 AM IST

Rhiti Tiwari Joins BJP

सार

Lok Sabha Election 2024 : खासदार मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारीने भाजपात एण्ट्री केली आहे. यावर रिती तिवारीने काय म्हटले आहे जाणून घेऊया सविस्तर....

Manoj Tiwari Daughter Rhiti Tiwari Joins BJP :  ऐन लोकसभा निवडणुकीवेळी दिल्लीतील माजी भाजप अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारीने भाजपात प्रवेश केला आहे. यावर रिती तिवारीने म्हटले की, मला कधीच वाटले नाही मी एवढ्या लवकर राजकरणात एण्ट्री करू शकते. यापुढे कोणालाही नाराज करणार नाही असे विधानही रीति तिवारीने केले आहे. रिती तिवारी गायक असून गीतकारही आहे. भाजपा खासदार मनोत तिवारींची मुलगी रीति तिवारीने म्हटले की, राजकरणात 10-15 वर्षांनी येण्याचा विचार होता. रीति तिवारी एका एनजीओमध्येही काम करते.

रीति तिवारीने काय म्हटले?
भाजपात प्रवेश केल्यानंतर रीति तिवारीने म्हटले की, “मी मनोज तिवारी यांची मुलगी आहे. मी 22 वर्षांची असून गायक आणि गीतकारही आहे. याशिवाय एका एनजीओमध्येही काम करते. मला समाजसेवक व्हायचे आहे.”

मी कोणालाही निराश करणार नाही- रीति तिवारी
रीति तिवारीने पुढे म्हटले की, मी हैराण आहे. मला कधीच वाटले नव्हते एवढ्या लवकर राजकरणात माझा प्रवेश होईल. खरंतर राजकरणात 10-15 वर्षांनी येण्याचा विचार केला होता. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माझ्यामध्ये काहीतरी पाहिले. यामुळे मी आश्वासन देते की, कोणालाही निराश करणार नाही.

मनोज तिवारी निवडणुकीच्या रिंगणात
उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभेच्या जागेवरून भाजपाने मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून मनोज तिवारी यांच्या विरोधात काँग्रेसचे कन्हैया कुमार उभे आहेत. काँग्रेसने उत्तर पूर्व दिल्लीतील जागेवरून कन्हैया कुमार यांना तिकीट दिलेय. दिल्लीत लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत. दिल्लीत सर्व जागांवर सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर केले जाणार आहेत.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, 7 मे ला अमित शाह, सुप्रिया सुळेंसह 'या' दिग्गज नेत्यांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद

राहुल गांधींनी पुन्हा एकदा सनातन परंपरेवर उपस्थितीत केले प्रश्न, पंतप्रधानांच्या द्वारका पूजेवरूनही केले हे विधान

Read more Articles on