सार

उत्तर प्रदेशमध्ये आता पाहिल्यासारखं गुंडाराज नसून विरोधकांनी गुंडांना दाखवून द्यावे, असे खुले आव्हानच एका तरुणीने भाजप सरकारच्या विरोधकांना केले आहे. 

'उत्तर प्रदेशमध्ये आता पाहिल्यासारखं गुंडाराज राहील नाही, कुठं आहे गुंडाराज हे दाखवून द्या असे ओपन चॅलेंज एका मुलीने विरोधकांना केले आहे. तिने भाजप सरकारने केलेल्या गुंडांच्या केलेल्या बंदोबस्ताचे कौतुकच केले आहे. 

हिडिओमधील मुलगी काय म्हणाली? - 
ती बोलताना म्हणते की आधी गुंडाराज होते पण आता आपण युपीमध्ये गेल्यास फक्त गुंडाराज दाखवून द्यावे. युपीमधील गुंडाराज पूर्णपणे बंद झाल्याचं तिने म्हटले आहे. ती पुढे बोलताना म्हणते की, आधी रेशन पण मिळत नव्हते. आता सर्वांना रेशन चांगल्या प्रकारे मिळायला सुरुवात झाली आहे. तिने पुढे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. 

ती म्हणते, राहुल गांधी पप्पू असून त्यांना काय बोलत आहेत आणि काय करत आहेत हेच कळत नाही. ते वाघासारख्या नरेंद्र मोदी यांना हटवून दाखवू शकत नाही. सगळे विरोधी पक्ष मिळून नरेंद्र मोदी यांना हरवू शकत नाही, एका वाघाच्या मागे किती कुत्रे गेले तरी त्याला ते हरवू शकत नाही, असा टोमणा तिने या व्हिडिओमध्ये मारला आहे.  जो स्वतः वाघ आहे तो एकटा चालतो बाकी कुत्रे तर किती जातील असा टोमणा तिने मारला आहे. 
आणखी वाचा - 
Panjab Crime News : गुरुद्वारा 'अपवित्र' केल्याच्या आरोपावरून जमावाने असे काही केले की, तरुणाचा मृत्यू झाला
महाविद्यालयातील 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, मृत्यूआधी पीडितीने सांगितली स्वत:सोबत घडलेली भयंकर स्थिती