सार

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला उदयपूर, राजस्थान येथून अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेत अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याला उदयपूर राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईत आणले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली असून त्याच्याकडून सदर प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. 

भिंडेला न्यायालयात केले जाणार - 
भावेश भिंडे याला पहाटे पाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते. मुंबईमध्ये भिंडेला आणल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या कार्यलयात नेले जाणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. घाटकोपर येथील होर्डिंगचे प्रकरण झाल्यानंतर तीन दिवसानानंतर अटक करण्यात आली आहे. 

सोमवारी सायंकाळी झाली दुर्घटना - 
सोमवारी सायंकाळी घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटना झाली आणि नागरिकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे हा त्याच्या चालकासह मुंबईतून फरार झाला. भावेश भिंडेला शोधण्यासाठी आठ पथके वेग वेगळ्या भागात तैनात करण्यात आले आहेत. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्याला उदयपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहेत. 

भावेश भिंडेला कशी अटक झाली? - 
भावेश भिंडे हा घाटकोपर येथील दुर्घटना झाल्यानंतर त्याच्या ड्रायव्हरला घेऊन पळाला. सुरुवातीला तो लोणावळ्याला गेला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मुंबईला आला. त्यानंतर भिंडे हा ठाणे आणि तिथून पुढे अहमदाबादला गेले. अनेकवेळा स्थलांतर केल्यानंतर तो आपले नाव बदलून उदयपूर येथील हॉटेलमध्ये जाऊन लपला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिंडे याला उदयपूर, राजस्थान येथून अटक केली. 

बचावकार्य कसे झाले? - 
मुंबईतील घाटकोपर येथून होर्डिंग कोसळण्याच्या ठिकाणी चाललेले बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्याने छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्याने याबद्दल बोलताना सांगितले आहे की, लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी होर्डिंगचे गज कापले होते. 
आणखी वाचा - 
चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ आणि रिल्स शूट करण्यावर बंदी, 31 मार्चपर्यंत VIP दर्शनही नाही
Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांच्यावर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीच चाचणी, वाचा प्रकरणातील आतापर्यंतची टाइमलाइन