'प्रज्वल रेवन्नांना भगवान श्रीकृष्णांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा होता, कर्नाटकातील मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून पेटला वाद

| Published : May 02 2024, 01:21 PM IST / Updated: May 02 2024, 01:22 PM IST

Prajwal Revanna.jpg
'प्रज्वल रेवन्नांना भगवान श्रीकृष्णांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा होता, कर्नाटकातील मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून पेटला वाद
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Prajwal Revanna Sexual Harassment Case : कर्नाटक सरकारमधील मंत्री रामप्पा तिम्मापुर यांनी म्हटले की, प्रज्वल रेवन्ना यांना भगवान श्रीकृष्णांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा होता. याच विधानावरून नवा वाद सुरू झाला आहे.

Prajwal Revanna Sexual Harassment Case : : कर्नाटकातील हसन येथील खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील एका मंत्र्यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. रामप्पा तिम्मापुर यांनी विधान करत म्हटले की, प्रज्वल रेवन्ना यांना भगवान श्रीकृष्ण यांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा होता. यामुळेच वाद सुरू झाला आहे.

रामप्पा तिम्मापुर यांचे वादग्रस्त विधान
रामप्पा तिम्मापुर यांनी म्हटले की, "प्रज्वल रेवन्ना यांना भगवान श्रीकृष्णाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा होता. असा वाईट विचार आम्ही देशात कधीच पाहिला नाही. पण रेवन्ना यांनी गिनिज रेकॉर्ड करण्याचा विचार केला असेल. स्रिया श्रीकृष्णासोबत भक्तीभावासोबत राहायचे. पण अशाप्रकारे नाही. खरंतर, प्रज्वल रेवन्ना यांना श्रीकृष्णाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा होता."

विधानावरून वाद पेटला
रामाप्पुरा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून नवा वाद पेटला आहे. नागरिकांकडून सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत. याशिवाय रामाप्पुरांचे विधान लज्जास्पद असल्याचेही म्हटले जात आहेत. एका भाजप नेत्याने हिंदू देवतांचा अपमान केल्याने रामप्पांना पदावरून हटवावे अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका युजरने लिहिले की, एक गोष्ट स्पष्ट होतेय काँग्रेस आणि हिंदू धर्म एकत्रित राहू शकत नाही. अन्य एका युजरने म्हटले की, मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करावी.

कोण आहेत प्रज्वल रेवन्ना?
प्रज्वल रेवन्ना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचे नातू आहेत. सध्या कर्नाटकातील हासन येथून विद्यमान खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हसन जागेवरून प्रज्वल रेवन्ना निवडणूक लढवत आहेत. याशिवाय कर्नाटकातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री एचडी रेवन्ना यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी त्यांचे काका आहेत.

प्रज्वल रेवन्नांच्या विरोधातील प्रकरण नक्की काय आहे?
हसन लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवणारे प्रज्वल रेवन्ना यांचा निवडणूक प्रचारावेळी मतदारांमध्ये काही व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये कथित रुपात प्रज्वल यांच्याकडून काही महिलांसोबत लैंगिक शोषण करत आहेत. हे व्हिडीओ कथित रुपात प्रज्वल यांनी स्वत:हून आपल्या मोबाइल फोनवर रेकॉर्ड केले होते. यानंतर फोनमधील व्हिडीओ लॅपटॉपवर ट्रान्सफर केले. व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रज्वल रेवन्ना यांच्या घरात आणि कार्यालयात केले होते. एका महिलेने प्रज्वल रेवन्ना यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावत त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : रायबरेली आणि अमेठी येथून राहुल की प्रियांका? कोणाला मिळणार उमेदवारी? आज अंतिम निर्णयाची शक्यता

स्मृती इराणी यांची संपत्ती किती? लाखाचे दागिने आणि मालमत्ता किती ?

Read more Articles on