Lok Sabha Election 2024 : रायबरेली आणि अमेठी येथून राहुल की प्रियांका? कोणाला मिळणार उमेदवारी? आज अंतिम निर्णयाची शक्यता

| Published : May 02 2024, 10:03 AM IST / Updated: May 02 2024, 10:09 AM IST

Rahul Gandhi

सार

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला पार पडले. अशातच उत्तर प्रदेशातील दोन जागा म्हणजेच अमेठी आणि रायबरेली येथील संस्पेस कायम आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमेठी (Amethi) आणि रायबरेली (Raebareli) येथील जागेवरून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. यावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी बुधवारी (1 मे) म्हटले की, “कोणीही घाबरलेले नाही. याबद्दलची घोषणा पुढील 24-30 तासात केली जाईल. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.” अशातच आज (2 एप्रिल) रायबरेली आणि अमेठी येथून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अमेठी-रायबरेलीत काँग्रेस कोणाला उतरवणार?
जयराम रमेश यांना अमेठी आणि रायबरेलीत कोणाला उमेदवारी दिली जाईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, जोवर अधिकृत निर्णय होत नाही तोवर सुरू असलेल्या चर्चा आणि आदेश केवळ अफवा आहेत. याशिवाय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी पक्ष घाबरतोय का असा सवालही विचारण्यात आला. त्यावेळी जयराम रमेश यांनी म्हटले की, कोणाताही उशीर झालेला नाही. चर्चा सुरू आहे. अधिकृत निर्णय लवकरच जाहीर होईल. दुसऱ्या बाजूला अमेठी येथून स्मृती इराणी (Smriti Irani) विद्यमान खासदार आहेत.

वर्ष 2019 मधील निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव
वर्ष 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठी येथून तिकीट देण्यात आले होते. पण स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव करत अमेठी येथून विजयी झाल्या होत्या. रायबरेली येथून सोनिया गांधी यांना विजय मिळाला होता. पण यंदा सोनिया गांधी निवडणूक लढवणार नाहीत. आता सोनिया गांधी राज्यसभेच्या सदस्या आहेत.

दुसऱ्या बाजूला राहुल गांधी केरळातील वायनाड येथून निवडणूक लढवत आहेत. याधीच्या निवडणुकीत राहुल गांधींचा वायनाड येथून विजय झाला होता. वायनाड येथे मतदान झाले आहे. अमेठी आणि रायबरेली येथे 20 मे रोजी मतदान होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 3 मे
अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवारी अर्ज भरण्यास 26 एप्रिलपासून सुरूवात झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 3 मे आहे. पण काँग्रेसकडून आज उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यास पक्षातील उमेदवारांबद्दलच्या सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळेल.

याशिवाय भाजपाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठी येथून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. स्मृती इराणी यांनी 29 एप्रिलला आपला उमेदवारी अरज दाखल केला आहे. दरम्यान, रायबरेली येथून अद्याप भाजपने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.

आणखी वाचा : 

रुपाली गांगुलीने केला भाजमध्ये प्रवेश, पंतप्रधान मोदींच्या कार्याने झाल्या प्रभावित

सुषमा स्वराज यांची लेक बांसुरी स्वराज यांच्याकडे किती मालमत्ता ?

Read more Articles on