ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद करताना शिंदे गटाची चिंता वाढवली आहे. विधिमंडळ पक्षात फूट ही संकल्पनाच कायद्यात अस्तित्वात नाही, असा दावा करत त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडायला सुरुवात केली आहे. त्यांच्या युक्तिवादामुळं शिंदे गटाचं टेन्शन वाढायला सुरुवात केली आहे. त्यांनी यावेळी विधिमंडळ पक्ष हि संकल्पनाच अस्तित्वात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधिमंडळ पक्षात फूट पडली असं कस म्हणता येईल असा प्रश्न सिब्बल यांनी विचारला आहे.
निवडणूक आयोगाने वाट पाहायला पाहिजे होती
कपिल सिब्बल यांनी यावेळी शिवसेना पक्षाची मजबूत बाजू लावून धरली आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळं कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील आहे. कोर्टात सुनावणीला उभं राहताच सिब्बल यांनी अपात्रतेची मुद्यावर बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी सिब्बल यांनी १०व्या अनुसूचीचा दाखला दिला आहे.
संकल्पनाच कायद्यात अस्तित्वात नाही
विधिमंडळ पक्षातील फूट हि संकल्पनाच कायद्यात अस्तित्वात नाही. एखाद्या सदस्याने स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्याच्या आधारावर अपात्रतेची याचिका दाखल झाली, तर त्यावर राजकीय पक्षाचा गट निवडणूक आयोगाकडे जाऊन आम्हीच तो राजकीय पक्ष आहोत, असा दावा करतो. यावेळी सिब्बल यांनी देसाई प्रकरणाचा दाखला आहे.


