सार

Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून मोठ्या प्रमाणात दारू-गोळा देखील जप्त करण्यात आला आहे. 

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना पोलीस आणि सुरक्षा दलाने अटक केली आहे.पोलीस सिक्युरिटी फोर्सेसने राजौरीमधील बुधल बेहरोटो परिसरात संयुक्तरित्या ही कारवाई केली. दहशतवाद्यांच्या साथीदारांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा देखील यावेळेस जप्त करण्यात आला. या कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या साथीदारांकडे दारू-गोळा, बंदुका आणि काही कागदपत्रे देखील होते.

दहशतवाद्यांचे दोन साथीदार अटकेत
पोलिसांनी असे सांगितले की, अटक करण्यात आलेल्या साथीदारांची ओळख पटली आहे. मोहम्मद नजीर (58) आणि फारूख अहमद (42) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. हे दोघेही राजौरी येथील रहिवासी आहेत. मोहम्मद आणि फारूखकडे आर्सेनल, एक पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन, 28 पिस्तूल बुलेट, दोन ग्रेनेड आणि एका बॅगेसह अन्य काही सामान होते. 

17 नोव्हेंबरनंतर सुरू केले ऑपरेशन
अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, 17 नोव्हेंबरला झालेल्या एन्काउंटरनंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली होती. बुधल पोलीस स्थानक परिसरात हा एन्काउंटर झाला होता. त्यादरम्यान, सिक्युरिटी फोर्सेसने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम हाती घेण्यात आली. दहशतवाद्यांच्या अटकेनंतरही पुढील तपास सुरू आहे आणि याप्रकरणी आणखी काही जण अटक होण्याचीही शक्यता आहे.

आणखी वाचा: 

North East Express Train Accident : नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेसचे 21 डबे घसरले, चौघांचा मृत्यू-70 जण जखमी

Madhya Pradesh Crime : क्रूरता ! वडिलांचा जीव जाईपर्यंत काठीने बेदम मारहाण करत होता पोटचा मुलगा, कारण…

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?