सार

Madhya Pradesh Crime News : पोटच्या मुलानेच वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात सध्या खळबळ उडाली आहे.

 

Madhya Pradesh Crime News : बाप-लेकाच्या सुंदर नात्याला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Crime News) पन्ना जिल्ह्यात घडली आहे. येथे एका मुलानं क्रूरतेची सीमा ओलांडून स्वतःच्याच वडिलांना बेदम मारहाण करत (son killed father) त्यांचा जीव घेतला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला अटक केली आहे. इतक्या क्रूर पद्धतीने स्वतःच्याच वडिलांची हत्या का केली? (crime news in marathi) याबाबत आरोपीची चौकशी केली जात आहे. मृत व्यक्तीचे नाव रामपाल गडारी असे असल्याचे म्हटले जात आहे.

वडिलांचा जीव जाईपर्यंत मुलगा करत होता मारहाण

पन्ना (Panna District) जिल्ह्यातील परसवाडा परिसरातील ही घटना आहे. जमिनीवर बसवण्यात आलेल्या टॉवरच्या रकमेवरून (Dispute over Land and Money) पिता-पुत्रामध्ये (Crime News) गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होते. पण गेल्या बुधवारी हा वाद इतका विकोपाला गेला की मुलाने काठीने बेदम मारहाण करत वृद्ध वडिलांचा अक्षरशः (Father Murder Case) जीवच घेतला. 

आसपास लोकांनी रक्तबंबाळ झालेल्या रामपाल गडारी यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कटनी जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पैशांच्या वाटणीवरून पिता-पुत्रामध्ये सुरू होते वाद

या प्रकरणाचा तपास करणारे शहानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी घनश्याम मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी मृत रामपाल गडारी यांनी एका खासगी कंपनीला टॉवर बसवण्यासाठी आपली जमीन दिली होती. 

या मोबदल्यात कंपनीने त्यांना भरपाई म्हणून काही रक्कम दिली. याच पैशांवरून रामपाल व त्यांचा मुलगा उत्तम यांच्यात वाद झाला. मुलाला त्याच्या हिश्श्याचे पैसे हवे होते आणि वडील ते देण्यास तयार नव्हते. 

याच वादातून हे धक्कादायक हत्याकांड घडले (Madhya Pradesh Murder News). आता पन्ना जिल्हा पोलिसांनी आरोपी मुलगा उत्तमविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा :

Girlfriend Murder Case : माथेफिरू प्रियकर! गर्लफ्रेंडची हत्या करून बॉयफ्रेंडनं स्वतःच्या गळ्यावरही केला वार, कारण...

ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च

मॉडर्न शेतकऱ्याचा कारनामा! महागड्या ऑडीमधून स्टाइलने येतो व रस्त्यावर विकतो ताजी भाजी