सार

दिल्लीतील आनंद विहारहून आसामला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे 21 डबे घसरल्याने दुर्घटना घडली आहे. रेल्वे अधिकारी आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

North East Express Train Accident : दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्टेशनहून आसामला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे (North East Express train derailed) 21 डबे रूळावरून घसरून दुर्घटना घडली आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी रेल्वे, एनडीआरएफ, मेडिकल टीम, स्थानिक प्रशासनाची टीम मदत व बचावाचे कार्य युद्धपातळी करत आहेत. स्थानिक नागरिकांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.

रघुनाथ स्थानकाजवळ घडला अपघात

बिहारमधील दानापूर विभागातील रघुनाथ रेल्वे स्थानकाजवळ (Raghunathpur station in Buxar) बुधवारी (11 ऑक्टोबर 2023) 9 वाजून 35 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, ‘बक्सरमध्ये दिल्लीहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे घसरल्याची (North East Express train derailed at Raghunathpur station) दुःखद माहिती मिळाली. 

घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, बक्सर आणि भोजपूर जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले. बिहार सरकार पीडित व जखमींना उपचार तसेच मदत मिळवून देण्याचे कार्यही युद्धपातळीवर करताहेत’.

नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस दुर्घटना

  • डब्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक मदत करत आहेत.
  • प्रवासी झोपण्याच्या तयारीत असताना दुर्घटना घडली.
  • बुधवारी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी हा अपघात घडला.
  • घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
  • मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
  • अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच मार्गात बदलही करण्यात आला आहे.

रेल्वेने जारी केले हेल्पलाइन क्रमांक

  • हेल्पलाइन क्रमांक PNBE - 9771449971
  • DNR - 8905697493
  • ARA - 8306182542
  • COML CNL - 7759070004
  • हेल्पलाइन क्रमांक प्रयागराज 0532-2408128 0532-2407353 0532-2408149
  • फतेहपूर 05180-222026 05180-222025 05180-222436
  • कानपूर 0512-2323016 0512-2323018 0512-2323015
  • टू्ंडला 05612-220338 05612-220339 05612-220337
  • अलिगड 0571-2409348

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री आणि बक्सर शहराचे खासदार अश्विनी चौबे यांनी सांगितले की, आम्ही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. यासोबतच बिहारचे डीजी, एनडीआरएफचे डीजी, बिहारचे मुख्य सचिव, डीएम आणि रेल्वेचे जीएम यांच्याशीही चर्चा झाली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य लोकही बचावकार्य युद्धपातळीवर करताहेत. डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. दुर्घटनेशी (North East Express train derailment) संबंधित अपडेट्स मी सातत्याने माहिती करून घेत आहे.

आणखी वाचा

Pathankot Terrorist Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी ठार, गोळ्या झाडून केली हत्या

Madhya Pradesh Crime : क्रूरता ! वडिलांचा जीव जाईपर्यंत काठीने बेदम मारहाण करत होता पोटचा मुलगा, कारण…

Girlfriend Murder Case : माथेफिरू प्रियकर! गर्लफ्रेंडची हत्या करून बॉयफ्रेंडनं स्वतःच्या गळ्यावरही केला वार, कारण…