IPL Auction 2024: आयपीएलच्या लिलावात 10 संघ 74 खेळाडू, वाचा कोणत्या Playerसाठी किती लावली बोली

| Published : Dec 20 2023, 10:39 AM IST / Updated: Dec 20 2023, 10:42 AM IST

IPL 2024

सार

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ट्वेन्टीं-20 क्रिकेटसाठी मंगळवारी लिलाव दुबईत पार पडला. यावेळी कोणत्या खेळाडूला किती बोली लावली गेली आणि सर्वाधिक बोली लावला गेलेला खेळाडू कोणता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ट्वेन्टीं-20 क्रिकेटसाठी मंगळवारी (19 डिसेंबर, 2023) दुबईतील (Dubai) कोका कोला अरिना (Coca-Cola Arena) येथे लिलाव पार पडला. पहिल्यांदाच हा लिलाव भारताबाहेर करण्यात आला होता. 

या आयपीएलच्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्सवर प्रथमच 20 लाख 50 कोटी रूपयांची बोली सनराइज हैदराबाद या संघाकडून लावली गेली.  पाहूयात यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणत्या खेळाडूला कोणत्या संघात स्थान मिळाले आहे याबद्दल  सविस्तर…

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

अल्झारी जोसेफ (11 कोटी 50 लाख), यश दयाल (5 कोटी), टॉम करन (1 कोटी 50 लाख), सौरव चौहान (20 लाख), स्वप्निल सिंह (20 लाख)

राजस्थान रॉयल्स

रोव्हमन पॉवेल (7 कोटी 40 लाख), शुभम दुबे (5 कोटी 80 लाख), टॉम कोहलेर-कॅडमोर (40 लाख), आबिद मुश्ताक (20 लाख)

पंजाब किंग्स

हर्षल पटेल (11 कोटी 75 लाख), ख्रिस वोक्स (4 कोटी 20 लाख), आशुतोष शर्मा, शशांक सिंह, विश्वनाथ सिंह, तनय त्यागराज (प्रत्येकी 20 लाख), रायली रूसो (8 कोटी)

कोलकाता नाइट रायडर्स

केएस भरत (50 लाख), चेतन सकारिया (50 लाख), मिचेल (24 कोटी 75 लाख), रमनदीप सिंग (20 लाख), अंगक्रिश रघुवंशी (20 लाख), शेर्फेन रूदरफोर्ड (1 कोटी 50 लाख), गस अ‍ॅटकिन्सन (1 कोटी), मनीष पांडे (50 लाख)

मुंबई इंडियन्स

जेराल्ड कोएट्सझी (5 कोटी), दिलशान मदुशंका (4 कोटी 60 लाख), श्रेयस गोपाल (20 लाख), नुवान तुषारा (4 कोटी 80 लाख), मोहम्मद नबी (1 कोटी 50 लाख), शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, नमन धीर (प्रत्येकी 20 लाख)

लखनऊ सुपर जायंट्स

शिवम मावी (6 कोटी 40 लाख), मणिमारन सिद्धार्थ (2 कोटी 40 लाख), डेव्हिड विली (2 कोटी), अ‍ॅश्टन टर्नर (1 कोटी), अर्शद खान (20 लाख), अर्शिन कुलकर्णी (20 लाख)

दिल्ली कॅपिटल्स

हॅरी ब्रूक (4 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (50 लाख), रिकी भुई (20 लाख), रखिस सालेम (20 लाख), झाय रिचर्डसन (5 कोटी), सुमित कुमार (1 कोटी), शाय होप (75 लाख), स्वस्तिक चिकारा (20 लाख)

सनरायझर्स हैदराबाद

पॅट कमिन्स (20 कोटी 50 लाख), ट्रॅव्हिस हेड (6 कोटी 80 लाख), वानिंदू हसरंगा (1 कोटी 50 लाख), जयदेव उनाडकट (1 कोटी 60 लाख), आकाश सिंह (20 लाख)

चेन्नई सुपर किंग्स

डॅरेल मिचेल (14 कोटी), शार्दूल ठाकूर (4 कोटी), समीर रिझवी (8 कोटी 40 लाख), मुस्ताफिझूर रहमान (2 कोटी), अरावेली अवनिश (20 कोटी)

गुजरात टायटन्स

अझमतुल्ला ओमरझई (50 लाख), उमेश यादव (5 कोटी 80 लाख), शाहरूख खान (7 कोटी 40 लाख), सुशांत मिश्रा (2 कोटी 20 लाख), कार्तिग त्यागी (60 लाख), मानव सुथार (20 लाख), स्पेन्सर जॉन्सन (10 कोटी), रॉबिन मिंझ (3 कोटी 60 लाख)

आणखी वाचा: 

IND vs AUS World Cup Final 2023 : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकली World Cup Trophy, टीम इंडियाचं स्वप्न भंगलं

Ayodhya Ground Report : अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी उभारली Tent City, जाणून घ्या खास गोष्टी

एकेकाळी दूध विक्री करायचे, आता वाढदिवशी घेणार CM पदाची शपथ