Marathi

Rajasthan New CM

एकेकाळी दूध विक्री करायचे, आता वाढदिवशी घेणार CM पदाची शपथ

Marathi

वाढदिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा येत्या 15 डिसेंबर (2023) रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या दिवशी शर्मा यांचा वाढदिवसही असतो.

Image credits: social media
Marathi

सरपंच ते मुख्यमंत्री प्रवास

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजन लाल एकेकाळी गावात दूध विक्री करायचे. त्यानंतर भजन लाल सरपंच झाले. कोणीही विचार केला नसेल की दूध विक्री करणारा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होईल.

Image credits: social media
Marathi

शेतीही करायचे

भजन लाल शर्मा भरतपूर जिल्ह्यातील अटारी गावातील रहिवासी आहेत. येथे आपल्या वडिलांसोबत शेती करायचे.

Image credits: social media
Marathi

भाजपविरोधात लढली पहिली निवडणूक

फार कमी लोकांना माहितेय, भजन लाल शर्मा यांनी पहिली निवडणूक भाजपाविरोधात लढली होती. त्या निवडणुकीत भजन लाल यांचा पराभव झाला होता.

Image credits: social media
Marathi

भाजपासोबत जोडले गेले

कॉलेजच्या दिवसात भजन लाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडले गेले. जिल्हा संघटनेत पदाधिकारी झाले. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष आणि राज्य स्तरावर संघटनेचे पदाधिकारीही होते.

Image credits: social media
Marathi

एकुलता एक मुलगा

भजन शर्मा हे तीन बहिणींचे एकुलते एक भाऊ आहेत. भजन लाल भरतपूर येथून जयपूर येथे आले आणि येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली. 

Image Credits: social media