- Home
- India
- IND vs AUS World Cup Final 2023 : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकली World Cup Trophy, टीम इंडियाचं स्वप्न भंगलं
IND vs AUS World Cup Final 2023 : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकली World Cup Trophy, टीम इंडियाचं स्वप्न भंगलं
- FB
- TW
- Linkdin
ऑस्ट्रेलियाचा विजयी सिक्सर
कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वविजेते (IND vs AUS World Cup Final 2023) होण्याची संधी गमावली. वन-डे वर्ल्ड कप 2023च्या (ICC Cricket World Cup 2023) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून भारताचा पराभव केला.
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वविजेते (Australia Lifts The World Cup Trophy For The Sixth Time) होण्याचा मान पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने दमदार शतक झळकावत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताने सलग 10 सामने जिंकले, पण हा अकरावा व महत्त्वाचा सामना जिंकण्यात संघाला यश मिळाले नाही.
Celebrations in the Aussie camp! 🎉#CWC23 #INDvAUS pic.twitter.com/qTHNfXXPxG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 19, 2023
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती, पण गिल व श्रेयसची खेळी अपयशी ठरली. यानंतर राहुल-विराटच्या जोडीने संथ-सावध पद्धतीने डाव सांभाळण्याचे काम केले. चाहत्यांना विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या. पण या सामन्यात त्याचीही जादू दिसली नाही. विराट बाद झाल्यानंतर राहुलवर धावसंख्या उभारण्याचे दडपण वाढले. पण ऑस्ट्रेलियाच्या दमदार खेळीसमोर टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारणे जमले नाही.
The winning moment 🤩 🇦🇺#CWC23 #INDvAUS pic.twitter.com/6p4R3g7H2o
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 19, 2023
1987 🏆 1999 🏆 2003 🏆 2007 🏆 2015 🏆 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ 🏆
𝙰𝚄𝚂𝚃𝚁𝙰𝙻𝙸𝙰 𝙰𝚁𝙴 #𝙲𝚆𝙲𝟸𝟹 𝙲𝙷𝙰𝙼𝙿𝙸𝙾𝙽𝚂 🎉 pic.twitter.com/YV19PzpV1n— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 19, 2023
CWC23 FINAL. Australia Won by 6 Wicket(s) https://t.co/5ieqhKIB0n #INDvAUS #CWC23 #Final
— BCCI (@BCCI) November 19, 2023
टीम इंडियाची खेळी ढेपाळली
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium Ahmedabad) भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023चा अंतिम सामना (India vs Australia World Cup 2023 Final) खेळला गेला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पण टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धावसंख्या उभारताना बरीच कसरत करावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या दमदार फिल्डिंग व बॉलिंगसमोर भारतीय खेळाडू कांगारूंना केवळ 241 धावांचेच आव्हान देऊ शकले. यातही विरोधी संघासमोर टीम इंडिया ऑलआऊट झाल्याचे स्पर्धेत पहिल्यांदाच घडले. यापूर्वी खेळलेल्या सामन्यांत भारतीय संघ एकदाही ऑलआऊट झाला नव्हता.
9⃣th FIFTY-plus score in #CWC23! 👏 👏
7⃣2⃣nd FIFTY in ODIs! 👌 👌
Virat Kohli continues his impressive run of form as #TeamIndia move past 130 in the #Final.
Follow the match ▶️ https://t.co/uVJ2k8mWSt#MenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/TMYYiJNeja— BCCI (@BCCI) November 19, 2023
IND vs AUS Final : टीम इंडिया अशी झाली ऑलआऊट
- पहिली विकेट : शुभमन गिल
शुभमन गिल 30 धावांवर बाद झाला. त्याने केवळ चार धावाच घेतल्या. शुभमनच्या या खेळीमुळे चाहते निराश झाले.
- दुसरी विकेट : रोहित शर्मा
76 धावांवर रोहितची विकेट पडली. पण रोहितने 47 धावा घेऊन चांगली सुरुवात करून दिली होती.
- तिसरी विकेट : श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर 81 धावांवर बाद झाला. तो केवळ चार धावा घेऊ शकला.
- चौथी विकेट : विराट कोहली
विराट कोहली बाद झाल्यानंतर संपूर्ण स्टेडिअममध्ये शांतता पसरली. 148 धावांवर विराट कोहलीची विकेट पडली. त्याने 54 धावा पूर्ण केल्या.
- पाचवी विकेट : रविंद्र जडेजा
जडेजाही केवळ 9 धावाच करू शकला.
- सहावी विकेट : केएल राहुल
सावध खेळी खेळत राहुलने 66 धावा पूर्ण केल्या, पण 203 धावांवर तो बाद झाला.
- सातवी विकेट : मोहम्मद शामी
211 धावांवर मोहम्मद शामी बाद झाला. सहाच धावा घेणे त्याला जमले.
- आठवी विकेट : जसप्रीत बुमराह
केवळ एक रन घेऊन जसप्रीत बुमराह आऊट झाला.
- नववी विकेट : सूर्यकुमार यादव, या खेळाडूनं 18 धावा घेतल्या.
- दहावी विकेट : कुलदीप यादव रन आऊट झाला.
टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारणे जमले नाही
Innings Break!#TeamIndia post 2⃣4⃣0⃣ on the board!
6⃣6⃣ for KL Rahul
5⃣4⃣ for Virat Kohli
4⃣7⃣ for Captain Rohit Sharma
Over to our bowlers now 👌
Scorecard ▶️ https://t.co/uVJ2k8mWSt #CWC23 | #MenInBlue | #INDvAUS | #Final pic.twitter.com/22oteriZnE— BCCI (@BCCI) November 19, 2023