सार
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे कौतुक केले. नेमके काय म्हणाले वाचा सविस्तर...
Rajeev Chandrasekhar On Interim Budget : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्त्वाचे पालन करून अमृतकाळ युगाची सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या कामाचा आणि गेल्या काही दशकातील यशाचा सुंदर सारांश दिला आहे.
मोदी सरकारच्या या तत्त्वामुळे भारत व भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक व परिणामकारक बदल झाले आहेत. बदलाचा सध्याचा वेग पाहता वर्ष 2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्याचे देशवासीयांनी ठरवल्याचे दिसत आहे”.
भारताची अर्थव्यवस्था
"गेल्या दशकभरात आपण तंत्रज्ञान आणि संरचनात्मक बदलांच्या मदतीने देशाच्या विकासाचा भक्कम पाया तयार केला आहे. वर्ष 2014मध्ये भारताची गणना जगातील पाच सर्वात नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये केली जात होती, तर आज आपला देश पहिल्या पाच देशांच्या यादीमध्ये आहे. भारत देश आज सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो", असेही ते म्हणाले.
2047पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य
राजीव चंद्रशेखर पुढे असेही म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला, शेतकरी, तरुण आणि गरीब यांना देशाचे चार स्तंभ मानतात, ज्यांना सक्षम बनवून आम्ही 2047पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. विकसित भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे.”
"विकसित भारताचे स्वप्न साकार करू"
“पंतप्रधान मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आपण गेल्या 10 वर्षात परिवर्तनाचा एक महत्त्वाचा काळ पाहिला आहे. ज्यामध्ये आम्ही अनेक ऐतिहासिक कामगिरी केल्या आहेत. हे पाहता मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की ‘सबका प्रयास’ आणि भविष्यातील शासन मॉडेलच्या मदतीने आपण देशाचा कायापालट करू आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करू”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती? जाणून घ्या