सार

Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशातील पर्यटन क्षेत्रासाठी सरकारच्या भरीव गुंतवणूक योजनांबाबतची माहिती देखील सांगितली.

Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशातील पर्यटन क्षेत्रासाठी सरकारच्या भरीव गुंतवणूक योजनांबाबतची माहिती देखील सांगितली.  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लक्षद्वीप बेटासह देशातील अन्य बेटांचा विकास करण्यावर भर देणार असल्याचे म्हटले. याकरिता पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटनाला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून लक्षद्वीप बेटास पर्यटन पायाभूत सुविधा व गुंतवणूक मिळणार आहे. लक्षद्वीप बेटास भारतीय पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ म्हणून स्थान देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटन केंद्रांच्या सर्वांगीण विकासाबाबत नेमके काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?

  • साठ ठिकाणी यशस्वीरित्या G20 बैठका आयोजित करून भारतातील विविधता जागतिक स्तरावर मांडली. देशाच्या आर्थिक ताकदीने (Economic Strength) देशाला व्यवसाय आणि परिषद पर्यटनासाठी एक आकर्षक ठिकाण बनवले आहे. देशातील मध्यमवर्गही आता पर्यटन करण्याची आकांक्षा बाळगत आहे. अध्यात्मिक पर्यटनासह (Spiritual Tourism) पर्यटनामध्ये स्थानिक उद्योजकतेसाठी प्रचंड संधी आहेत.
  • प्रतिष्ठित पर्यटन केंद्रांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी (Comprehensive Development), जागतिक स्तरावर त्यांचे ब्रँडिंग (Branding )आणि मार्केटिंग करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित केले जाईल. सुविधा आणि सेवांच्या गुणवत्तेवर आधारित केंद्रांच्या रेटिंगसाठी एक रचना तयार केली जाईल. यासारख्या विकासासाठी समान आधारावर वित्तपुरवठा करण्यासाठी राज्यांना दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज दिले जाईल.
  • देशांतर्गत वाढत्या पर्यटनाला सामोरे जाण्यासाठी लक्षद्वीपसह (Lakshadweep) अन्य बेटांशी जोडणाऱ्या सुविधा, पर्यटन पायाभूत सुविधा आणि सुविधांसाठी प्रकल्प हाती घेतले जातील. त्यामुळे रोजगार निर्मितीलाही मदत होणार आहे.

आणखी वाचा

Budget 2024 : सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही - निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती? जाणून घ्या