सार

Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा विस्तारित करण्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.

Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत (Ayushman Bharat Scheme) आरोग्य सेवा कवच (Healthcare Cover) विस्तारित करण्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. यावेळेस त्यांनी म्हटले की, यामध्ये आता सर्व आशा वर्कर्स (Asha Workers) (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त), अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) आणि मदतनीसांचा समावेश असेल. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सर्वसमावेशक आरोग्य सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

आयुष्मान भारत योजनेमध्ये आशा आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश करण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे कार्यकर्ते तळागाळातील आरोग्य आणि सामाजिक सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत आरोग्य सुरक्षा उपक्रमामध्ये त्यांचा समावेश करणे हे त्यांचे आवश्यक योगदान दर्शवते.

आरोग्य व्यवस्था होईल मजबूत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोग्य सेवा व्यवस्थेला बळकटी देण्याच्या आणि सामाजिक आरोग्य सेवांमध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. सरकारचे हे पाऊल केवळ आशा आणि अंगणवाडी सेविकांचे कल्याण दर्शवत नाही तर पूर्वीपेक्षा अधिक समावेशक आणि मजबूत आरोग्य सेवेतील रचना तयार करण्यासाठी सरकारचे कार्यही दर्शवते.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मोफत लस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकार गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer Vaccination) रोखण्यासाठी काम करत असल्याचेही सांगितले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण केले जाईल. यासाठी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे. माता आणि बाल संगोपन योजना या सर्वसमावेशक कार्यक्रमांतर्गत आणण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा : 

Interim Budget 2024: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लक्षद्वीपसह अन्य बेटांकरिता मोठी गुंतवणूक - निर्मला सीतारमण

Budget 2024 : सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही - निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती? जाणून घ्या