Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती? जाणून घ्या
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती आहे ? जाणून घ्या सविस्तर माहिती…
| Published : Feb 01 2024, 10:54 AM IST / Updated: Feb 01 2024, 12:14 PM IST
- FB
- TW
- Linkdin
Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी Interim Budget 2024 सादर केला. सीतारमण यांनी सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करून त्यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबर केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) या लंडनमधील हॅबिटॅट सेंटरमध्ये सेल्सपर्सन म्हणून कार्यरत होत्या. युकेमधील (UK) कृषी अभियंता संघटनेच्या एका अर्थशास्त्रज्ञाच्या असिस्टंट म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
देशाच्या तिजोरीचा हिशेब ठेवणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांची एकूण संपत्ती 2 कोटी 74 लाख 95 हजार 222 रूपये इतकी आहे.
रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी कोणत्याही कर बचत योजनेमध्ये गुंतवणूक केलेली नाही. चार बँकांमध्ये त्यांची खाती असून त्यामध्ये 8 लाख 44 हजार 935 रूपये जमा आहेत.
रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) व त्यांच्या पतीच्या नावे संयुक्तीरित्या एक बंगला देखील आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 99 लाख 36 हजार रूपये इतकी आहे.
रिपोर्ट्सनुसार, निर्मला सीतारमण यांच्या नावे बिगरशेती जमीन देखील आहे. या जमिनीची किंमत 16 लाख 2 हजार रूपये इतकी आहे.
भारत सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या पगाराच्या आकडेवारीनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मासिक वेतन 4 लाख रूपये इतके आहे.
आणखी वाचा :