IIT bombay

Share this Video

सुजात आंबेडकर यांनी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूबाबत जातीय छळाचा आरोप करत हा प्रकार ‘संस्थात्मक हत्या’ असल्याचा दावा केला. साहिलच्या आई-वडिलांचे जबाब पोलिसांनी नोंदवावेत आणि त्यातून साहिलने त्यांच्याकडे मांडलेल्या कथित जातीय छळाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. विदर्भातील गरीब परिस्थितीतून आलेल्या मराठी विद्यार्थ्याचा एका उत्तर भारतीय प्राध्यापकाने छळ केल्याचा आरोप करत, राज ठाकरे या मराठी विद्यार्थ्यासाठी पुढे येणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रोहित वेमुला प्रकरणावरून त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. तसेच IIT मुंबईतील संबंधित विभागात SC प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व अत्यल्प असल्याचा दावा करत SC-ST प्रवर्गातील सर्व रिक्त पदे जाहीर करून तातडीने भरावीत, अशी मागणी केली. वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर सोडल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video