स्विगी आणि झोमॅटोच्या वाढत्या डिलिव्हरी चार्जेसमुळे ऑनलाईन जेवण मागवणे महाग झाले आहे. यावर उपाय म्हणून एका महिलेने सोशल मीडियावर एक भन्नाट युक्ती शेअर केली आहे. ती आता उबर आणि रॅपीडो वापरून जेवण मागवते, ज्यामुळे तिचा खर्च कमी झाला आहे.

आपण ऑनलाईन माध्यमातून जेवण मागवल्यास आपला खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत जातो. स्विगी आणि झोमॅटो या दोन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जेवण मागवलं जात. शहरांमध्ये नोकरीच्या माध्यमातून अनेक लोक राहत असतात, हे लोक खासकरून जेवण मागवतात. त्यांना जेवण बनवायला जमत नसल्यामुळे ते जेवण मागवत असतात.

चार्जेस वाढवायला सुरुवात झाली 

वाढत्या मागणीसोबत चार्जेस वाढायला सुरुवात झाली आहे. कधी कधी डिलिव्हरी चार्जेस वाढवतात आणि ते वाढवल्यामुळं जेवणाची किंमत वाढत जाते. अनेक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या परिस्थितीवर एका महिलेने भन्नाट उपाय शोधून काढला आहे. आपण हीच पद्धती जाणून घेऊयात.

महिलेने सोशल मीडियावर अनुभव केला शेअर 

एका महिलेनं फूड डिलिव्हरी अ‍ॅप्स वापरताना आलेला अनुभव @stonksqween या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. झोमॅटो आणि स्विगी या दोन प्लॅटफॉर्मवरून महिलेने जेवण मागवायचे बंद केलं आहे. आता ती महिला पदार्थ मागवून उबेर आणि रॅपीडो या दोन प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवत असते. त्यांचे चार्जेस हे फूड डिलिव्हरी अँपपेक्षा कमी आहेत.

डिलिव्हरीसाठी किती होतो खर्च 

डिलिव्हरीसाठी आता फक्त ५० ते १०० रुपये कमी पैसे लागत असतात. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून जवळपास ४ लाख लोकांनी या महिलेच्या पोस्ट पहिल्या आहेत. फूड प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवल्यास जास्त पैसे लागतात, त्यामुळं महिलेची पोस्ट चांगली व्हायरल होत आहे.