नववर्षात विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, मुंबई-दिल्लीसह या 7 ठिकाणी ALERT

| Published : Dec 28 2023, 11:58 AM IST / Updated: Dec 28 2023, 12:04 PM IST

Ahmedabad airport

सार

नववर्षात देशातील सात विमानतळांवर बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई-दिल्लीसह अन्य काही ठिकाणच्या विमानतळांचा समावेश आहे. या प्रकारामुळे तपास यंत्रणा अ‍ॅलर्ट झाल्या आहेत.

Hoax Bomb Threat email to Jaipur International Airport : नववर्षात देशातील जयपूरसह सात विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force) आणि अन्य सुरक्षा यंत्रणा अ‍ॅलर्ट झाल्या आहेत. विमानाची तपासणी करूनच प्रवाशांना आतमध्ये पाठवले जात आहे.

मुंबई-दिल्लीसह ही विमानतळे निशाण्यावर
जयपूर व्यतिरिक्त दिल्ली, लखनऊ, चंदीगड, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. जयपूर विमानतळाच्या संचालक अधिकाऱ्यांच्या ई-मेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. या ईमेलनंतर खळबळ उडाली आहे.

जयपूरमध्ये विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे आणखी एक पथक तैनात करण्यात आले आहे. विमानतळ पोलिस स्थानकाकडून या प्रकरणाचा स्वतंत्रपणे अधिक तपास करत आहेत. विमानतळाच्या प्रशासनानुसार सध्या दिल्लीत खूप धुक पडल्याने बहुतांश विमान उड्डाणे ही दिल्लीहून जयपूरकडे वळवण्यात येत आहेत.

प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी विमानतळ उडवण्याची धमकी
पाच दिवसांपूर्वीही अशीच एक घटना समोर आली होती. राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्यात राहणाऱ्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी उत्तर प्रदेशातील प्रियकराने तिचा मोबाइल क्रमांक हॅक केला. यानंतर जयपूर, अयोध्यासह काही विमानतळांवर आरडीएक्स स्फोटक लावून विमानतळ उडवण्याची धमकी दिली. पण तपासानंतर धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली.

आणखी वाचा: 

Bus Accident : ट्रकच्या धडकेनंतर बसला लागली आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू, 17 जखमी

31st December Deadline Alert : यंदाचे वर्ष संपण्याआधी करा ही महत्त्वाची कामे, अन्यथा होईल नुकसान

मुंबईत RBIसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, या 2 मोठ्या व्यक्तींच्या राजीनाम्याची केली मागणी