सार

Bus Accident : मध्य प्रदेशातील गुना येथे ट्रकच्या धडकेनंतर बसला आग लागली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 17 प्रवासी जखमी झाले आहेत.

Madhya Pradesh Bus Accident : मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी (27 डिसेंबर 2023) रात्री भीषण अपघात घडला. बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातानंतर बसला आग लागली. या दुर्घटनेत बसमधील 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 17 जण जखमी झाले आहेत.

गुनाचे जिल्हाधिकारी तरुण राठी यांनी सांगितले की, बस आणि ट्रक या वाहनांमध्ये झालेल्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या 17 प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींच्या प्रकृतीला धोका नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

डीएनए टेस्टद्वारे होणार मृतांची ओळख

जिल्हाधिकारी तरुण राठी यांनी सांगितले की, ट्रकच्या धडकेनंतर बसने पेट घेतला. अपघातानंतर जे प्रवासी तातडीने बसबाहेर पडले त्यांचा जीव वाचला. तर 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रवाशांचे मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे शक्य नाही. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाईल. अपघातस्थळावरून सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच अपघाताच्या कारणांचाही शोध घेण्यात येत आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते. यापैकी चार जणांना बसमधून सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळाले. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सात प्रवासी जखमी

तर अन्य एका अपघातात बस आणि डम्परची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. गुना अरॉन मार्गावर हा अपघात झाला. जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा

Bharat Rice : पीठ-डाळीनंतर आता भारत राइस येणार, सरकार 25 रुपये किलोने विकणार तांदूळ

Success Story : नोकरी सोडून हा तरुण विकतोय गाढविणीचे दूध, व्यवसायामुळे झाला लक्षाधीश

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी पाठवण्यात आल्या तब्बल 42 घंटा, पाहा भाविकांनी कशी केली पूजा