ALERT! सॅमसंगचा फोन वापरताय? सरकारने दिला महत्त्वाचा इशारा, धोका टाळण्यासाठी त्वरित उचला हे पाऊल

| Published : Dec 14 2023, 06:41 PM IST / Updated: Dec 14 2023, 08:30 PM IST

Samsung Galaxy A23

सार

Samsung User Warning : सॅमसंग कंपनीचा फोन वापरणाऱ्या युजर्संना सरकारकडून हाय रिस्क अ‍ॅलर्ट (High Risk Alert) देण्यात आला आहे. अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….

Govt Alert for Samsung Users : तुम्ही देखील सॅमसंग कंपनीचा फोन वापरताय का? तर मग ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. सॅमसंग कंपनीचा फोनचा वापर करणाऱ्या कोट्यवधी युजर्संना सरकारने महत्त्वाचा इशारा दिला आहे. भारतातील युजर्संसाठी हा इशारा जारी करत सॅमसंगचा फोन (Samsung Smartphone) अपडेट करण्याचे आवाहन सरकारकडून (Indian Government) करण्यात आले आहे.

त्वरित उचला हे पाऊल 

‘CERT In’ ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाकडून (Indian Computer Emergency Response Team) सिक्युरिटी रिस्कची (Security Risk) माहिती देत सॅमसंग फोन वापरणाऱ्या युजर्संना आपला फोन अपडेट करण्यास सांगितले आहे. 

जे युजर्स अ‍ॅन्ड्रॉइड 11, 12, 13 आणि 14 व्हर्जन असलेल्या फोनचा वापर करताहेत, त्यांचासाठी हा इशारा देण्यात आला आहे. सीईआरटी इन (CERT In)ने दिलेल्या माहितीनुसार, या व्हर्जनमधील काही समस्यांमुळे सायबर हल्ला होऊ शकतो. 

दुर्लक्ष करण्याची चूक पडेल महागात 
'सीईआरटी इन'कडून जारी करण्यात आलेला अ‍ॅलर्ट ‘हाय रिस्क व्हॉर्निंग’ प्रकारातील (High Risk Warning) आहे. या माहितीनुसार वाचकहो जर आपण देखील सॅमसंग कंपनीचा 11 ते 14 मधील कोणत्याही व्हर्जनचा फोन वापरत असाल तर वेळीच सावध. सायबर हल्ल्यासारखे धोके टाळण्यासाठी सरकारने सांगितलेल्या सूचना लवकरात लवकर फॉलो करा, अन्यथा स्मार्टफोनमधील महत्त्वाची माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. 

अशा प्रकारचे होऊ शकते नुकसान
सायबर हल्लेखोर तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा सहज चोरी करू शकतात. याशिवाय तुमच्या स्मार्टफोनला सायबर हल्लेखोर कंट्रोलही करू शकतात. यामुळे गंभीर स्वरुपातील समस्या निर्माण होऊ शकतात.

सॅमसंगचे हे मॉडेल वापरताय? मग वेळीच व्हा सावध 

गॅलेक्सी एस 23 सीरिज, गॅलेक्सी जेड फ्लिप5, गॅलेक्सी जेड फोल्ड5 सॅमसंग कंपनीच्या यासारख्या मोबाइल फोन सीरिजना धोका असल्याचंही 'सीईआरटी इन' कडून माहिती देण्यात आली आहे. 

आणखी वाचा: 

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेमध्ये सर्वात गंभीर चूक

Article 370 : या न्यायाधीशांनी कलम 370 वर सुनावला ऐतिहासिक निर्णय

Platform Ticket Validity : प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता किती तासांची असते? अधिक वेळ थांबल्यास…